शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

Maharashtra Election 2019 ; शक्तीप्रदर्शनाद्वारे उमेदवारांचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : येत्या २१ आॅक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, भाजपचे नाना श्यामकुळे, काँग्रेसच्या ...

ठळक मुद्देवडेट्टीवारांची जम्बो रॅली, श्यामकुळे, प्रतिभा धानोरकर, चटप यांचेही अर्ज दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येत्या २१ आॅक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, भाजपचे नाना श्यामकुळे, काँग्रेसच्या प्रतिभा सुरेश धानोरकर व स्वभापचे अ‍ॅड. वामनराव चटप यांच्यासह १२ जणांनी गुरुवारी आपले नामांकन अर्ज दाखल केले. या चारही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी नामांकन दाखल करण्यासाठी मिरवणुकीच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या रॅली व शक्तीप्रदर्शनामुळे चंद्रपूर, ब्रह्मपुरी, वरोरा व राजुरा शहर दणाणून गेले होते. नागरिकही उमेदवारांचे शक्तीप्रदर्शन बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते.शक्तीप्रदर्शनाद्वारे श्यामकुळेंचा अर्ज दाखलचंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपाचे उमेदवार नाना श्यामकुळे यांनी गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे उमेदवारी अर्ज दाखल केला.तत्पूर्वी रॅलीत सहभागी होण्यासाठी हजारो भाजपा कार्यकर्ते व नागरिक स्वयंस्फूर्तीने येथील शिवाजी चौकात एकत्र झाले. त्यानंतर शिवाजी चौकातून विराट रॅली काढण्यात आली. हजारो कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते.राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर व उमेदवार नाना श्यामकुळे हे एका जिप्सीमध्ये उभे होते. ही रॅली बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी उसळली होती. नागरिकांना स्वत: अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार जिप्सीवरून अभिवादन करीत होते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर