शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाआॅनलाईनने ६० लाख रुपये बुडविले

By admin | Updated: September 29, 2014 00:41 IST

राजुरा शहरात मागील दोन वषात अनेक घोटाळे उघडकीस आले. कधी दाम दुपटीचा घोटाळा तर कधी आरडीच्या फसवणुकीचा घोटाळा आता राजुरा तहसील कार्यालयात कॉम्प्युटर आॅपरेटर

आॅपरेटर्स वेतनापासून वंचित : ११ कर्मचाऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशाराराजुरा (चंद्रपूर) : राजुरा शहरात मागील दोन वषात अनेक घोटाळे उघडकीस आले. कधी दाम दुपटीचा घोटाळा तर कधी आरडीच्या फसवणुकीचा घोटाळा आता राजुरा तहसील कार्यालयात कॉम्प्युटर आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांना मागील अडीच वर्षांपासून पगारच मिळाला नाही. या कर्मचाऱ्याचे वेतन ६० लाख रुपये होत असून ते बुडण्याची दाट शक्यता आहे. परिणामी येथील कर्मचारी पंकज गाडे यांनी त्वरित वेतन अदा न केल्यास आत्मदहन करण्याचा इशारा ‘लोकमत’शी बोलताना दिला. महाआॅनलाईन कंपनीच्या प्रकल्प प्रबंधकांनी २ आॅक्टोबर २०११ ला परशुराम प्रधाने, पंकज गाडे, करुणा चिकाटे, आसमा सय्यद, वर्षा मडावी, विनोद जाधव, आशिष बावनवाडे, महेंद्र चौधरी, विठ्ठल ढोरे, दुर्गा मोटघरे, ख्वाजा शेख या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले. तेव्हा हे सर्व कर्मचारी नियमीतपणे सावली, राजुरा, कोरपना, मूल, बल्लारपूर, गोंडपिपरी, पोंभूर्णा, वरोरा, ब्रह्मपुरी, चिमूर, जिवती तहसील कार्यालयात डाटा एन्ट्रीचे काम मागील अडीच वर्षांपासून करीत आहे. परंतु अजुनपर्यंत त्यांना मानधन मिळालेले नाही. शासनाने ‘आम आदमी विमा योजना’ व विशेष सहाय्य योजनांसाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम महाआॅनलाईन लिमिटेड ही राज्य शासन आणि डाटा कन्स्लटन्सी सर्व्हिसेस यांची राज्य शासनाच्या अधिकाराखालील स्थापन केलेली संयुक्त कंपनी आहे. संगणक चालक आऊटसोर्सींच्या तत्त्वावर नियुक्त करून या कर्मचाऱ्यांकडून चंद्रपूर जिल्ह्यातील तहसील कार्यालयात काम करून घेतले. परंतु या कर्मचाऱ्यांचे मानधन जवळपास ६० लाख रुपये अजुनपर्यंत मिळाले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आली असून त्वरित मानधन देण्याची मागणी पंकज गाडे सह सर्व कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (शहर प्रतिनिधी)