लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : येथील श्रीराम गणेश उत्सव मंडळातर्फे सर्व धर्मीय बांधवांच्या उपस्थितीत श्रीगणेशाची महाआरती घेण्यात आली. हा उपक्रम सर्व धर्मीय एकतेचा महान संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले.घुग्घुस येथे आयोजित महाआरती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी व आमदार नाना श्यामकुळे आदी उपस्थित होते.सर्वांनमध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण व्हावी, सर्व धर्माप्रती आदरभाव निर्माण व्हाव, एकतेची कास सर्वांनी धरावी, यासाठी श्रीराम गणेश उत्सव मडंळानी सदर उपक्रमाचे आयोजन केले होते. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. महाआरतीमुळे घुग्घुसवासियांमध्ये एकतेचा चांगला पवित्र संदेश दिल्या गेला असुन, घुग्गुस शहराचे पर्यावरण जपण्याकरिता याचप्रमाणे एकत्र येवून काम करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी या उपक्रमातून सर्वांमध्ये सर्वधर्मभावपणा निर्माण होते. एकोपा वाढते त्यामुळे हा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. त्यानंतर आमदार नाना श्यामकुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व धार्मीय नागरिकांच्या उपस्थितीती महाआरतथी करण्यात आली.याप्रसंगी बॉयो मॅटल्सचे उपाध्यक्ष प्रशांत पुरी, चिन्नाजी नलभोगा, लक्ष्मण सादलावार, भाजपा शहर अध्यक्ष विवेक बोढे, जिल्हा परिषद सदस्य नितू चौधरी, पंचायत समिती सदस्य निरीक्षण तांड्रा, रामचंद्र चंदनखेडे , गंगाधर गायकवाड, बंडु रामटेके, भिमराव कोकरे, जगण जवादे, अनिरुध्द आवळे, पास्टर आंनद गुणदेटी, पास्टर जतीण, पास्टर रुबेण, पास्टर प्रभुकुमार, पास्टर वेलस्ली कलगुर, सुरेन्द्र सिंग, प्रताप सिंग, सम्मत सिंग, प्रितम सिंग, गुरुपाल सिंग, जतिंदर सिंग, बबलु सिंग,प्रेमलाल पारधी, रमेश बोबडे, रामचंद्र डांगरे, सजंय शेरकी, सुरेश ढवस,ईसाक भाई, ईब्राहिम शेख, शेख हनिफ, शेख चाल, बाबाभाई कुरेशी, मुन्नाभाई लोहाणी, मुज्जु लोहानी, अब्दुल सिद्दिकी, पोलीस निरीक्षक सत्यजित आमले, उपसरपंच संतोष नुन्ने, सुरेंद्र जोगी, सुनील बाम, प्रा. हेमंत उरकुडे, अमोल थेरे, ग्रा.प साजन गोहणे ,प्रकाश बोबडे, राजकुमार गोडसेलवार, संजय तिवारी, श्रीनिवास इसारप, पुजा दुर्गम, वैशालीताई ढवस, सुचिता लुटे, सुषमाताई साव आदी उपस्थित होते.
गणेशाची महाआरती एकतेचा संदेश देणारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:44 IST
येथील श्रीराम गणेश उत्सव मंडळातर्फे सर्व धर्मीय बांधवांच्या उपस्थितीत श्रीगणेशाची महाआरती घेण्यात आली. हा उपक्रम सर्व धर्मीय एकतेचा महान संदेश देणारा आहे, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले. घुग्घुस येथे आयोजित महाआरती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी व आमदार नाना श्यामकुळे आदी उपस्थित होते.
गणेशाची महाआरती एकतेचा संदेश देणारी
ठळक मुद्देदेवराव भोंगळे : महाआरती कार्यक्रमाला जिल्हाधिकारी