शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात सर्वात कमी ५२ टक्के मतदान

By admin | Updated: February 18, 2017 00:33 IST

जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी गुरूवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६९.४७ टक्के मतदान झाले आहे.

सरासरी ६९.४७ टक्के : जिल्हाभरात मतदार यादीत घोळचंद्रपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी गुरूवारी झालेल्या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी ६९.४७ टक्के मतदान झाले आहे. उशिरा रात्री पोलिंग पार्ट्या पोहोचल्यानंतर शुक्रवारी प्रशासनाने मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर केली. त्यामध्ये चंद्रपूर तालुक्यात सर्वात कमी ५२.४९ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अनेकांना मतदान न करताच परत जावे लागले. चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५६ व १५ पंचायत समित्यांच्या ११२ जागांकरिता गुरूवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. ते सायंकाळ ५.३० वाजेपर्यंत सुरू होते. काही मतदार वेळेवर पोहोचल्याने त्यांचे मतदान करून घेण्यात आले. दुपारी १२.३० वाजतापर्यंत २३ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा ओघ वाढला. मतदान केंद्राबाहेर मोठ्या रांगा लागल्या. परंतु चंद्रपूर तालुक्यात सायंकाळपर्यंतही टक्केवारीमध्ये फारशी सुधारणा झाली नाही. तेथे १२.३० वाजेपर्यंत १४.११ टक्के, २.३० वाजेपर्यंत २३.७१ टक्के आणि सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ५२.४९ टक्के मतदान झाले.मतदार यादीमध्ये घोळ असल्याने अनेक मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. प्रशासनाने नवीन मतदार नोंदणी केल्यानंतर जानेवारी महिन्यात अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली. त्या यादीच्या आधारेच मतदान घेण्यात आले. त्यानंतर मतदारापर्यंत चिठ्ठ्या पोहोचविण्यात न आल्याने मतदारांना आपला मतदार क्रमांक आणि मतदान केंद्र क्रमांक, याची माहिती मिळू शकली नाही. मतदानादरम्यान, बल्लारपूर तालुक्यात कवडजई येथील मतदान केंद्रावर सहायक पोलीस उपनिरीक्षक शेख नजीर शेख यांच्यावर दोघांनी हल्ला चढविला. तर गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव येथील मतदान केंद्रावर इव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काही वेळ मतदान खोळंबले होते. (प्रतिनिधी) चंद्रपूर तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघांचा परिसर बहुतांश नागरी वस्तीचा आहे. या भागातील उद्योगांमध्ये बाहेरगावचा मजूर वर्ग काम करतो. तो गावाकडे गेला की, मतदान करू शकत नाही. त्यामुळे चंद्रपूर तालुक्यात कमी मतदान झाल्याचे दिसून येते. प्रशासनाने मतदार जागृती मोहीम राबविली आहे. मतदानात वाढ व्हावी, याकरिता प्रशासनातर्फे यापुढेही प्रयत्न केले जातील.- आशिष वानखेडे, तहसीलदार, चंद्रपूर.सर्वाधिक ब्रह्मपुरीत ७९.७२ टक्केअंतिम मतदान संख्येनुसार, जिल्ह्यात ब्रह्मपुरी तालुक्यात सर्वाधिक ७९.७२ टक्के मतदान झाले आहे. सिंदेवाही तालुक्यात ७६.८१ टक्के, मूल ७५.८६ टक्के, पोंभुर्णा ७५.१९ टक्के, सावली ७४.०६ टक्के, चिमूर ७२.८९ टक्के, नागभीड ७२.६२ टक्के, जिवती ७२.३१ टक्के, गोंडपिपरी ७१.६९ टक्के, राजुरा ७०.४७ टक्के, कोरपना ६९.५३ टक्के, वरोरा ६७.५६ टक्के, बल्लारपूर ६४.१७ टक्के, भद्रावती ६२.८६ टक्के आणि चंद्रपूर तालुक्यात ५२.४९ टक्के मतदान झाले आहे.