शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चंद्रपूर जिल्ह्यात अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:49 IST

सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये फेरबदल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याचे पडसाद देशात उमटू लागले आहे. सोमवारी विविध संघटनांनी या निर्णयाविरोधात पुकारलेल्या भारत बंदला चंद्रपूर जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला.

ठळक मुद्दे‘तो’ निर्णय रद्द करा : ठिकठिकाणी प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये फेरबदल करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याचे पडसाद देशात उमटू लागले आहे. सोमवारी विविध संघटनांनी या निर्णयाविरोधात पुकारलेल्या भारत बंदला चंद्रपूर जिल्ह्यात अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ सावली येथे संमिश्र बंद पाळण्यात आला. इतर ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले.भारत बंदच्या हाकेला ओ देत सावली येथील बौद्ध समाजाच्या वतीने बंदचे आवाहन केले होते. याला सावलीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती तर काहींनी सुरू. दुपारी १२ वाजताच्या सुमारास तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.चंद्रपुरात बंदचा कुठेही असर दिसून आला नाही. मात्र गोंडवाना गणतंत्र पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, समता सैनिक दल, भारतीय बौध्द महासभा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी राजू झोडे, मनोज आत्राम, नामदेव शेडमाके, संजय वानखेडे, डॉ. संदीप शेंडे, रमेश मेश्राम, महेंद्र झाडे, प्रशात गावंडे, सुरज रामटेके, बलदेव धुर्वे, गजानन कोहळे, सांरग कुमरे, मोनल भडके आदी उपस्थित होते.भद्रावती तालुक्यातील माजरी येथील डॉ. आंबेडकर चौकात राष्टÑीय महादलित परिसंघ, कॉग्रेस पार्टी, भारिप बहुजन महासंघ, एससी, एसटी कौन्सिल, बहुजन समाज पार्टी व दलित आदिवासी समाज एकत्र आले. त्यानंतर सर्वांनी माजरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणेदार कृष्णा तिवारी, भद्रावतीचे नायब तहसीलदार काळे यांच्या माध्यमातून राष्ट्रपती यांना निवेदन पाठविले. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी भारिपचे उल्लास रत्नपारखी, रमेश तायवाडे, गोलू गुलगुंडे, काँग्रेसचे गोल्ला कोमारैया, रवी कुडुदुला, सतीश कुदुडुला, भोगे मल्लेश, राष्ट्रीय महादलित परिसंघाचे महराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश रेवते, एससी, एसटी कौन्सिलचे किशोरीकांत चौधरी, बहुजन समाज पार्टी राजेंद्र प्रसाद आदी उपस्थित होते.चिमूर येथील त्रिशरण महिला मंडळाच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नगरसेविका कल्पना इंदूरकर, किरण भैसारे, वनिता सहारे, रजनी मेश्राम, सिंधु अंबादे उपस्थित होते.