शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातला ‘दुल्हनिया’ नेणारा ‘दिलवाला’ गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 11:20 IST

अचानक ‘दुल्हनिया’ला पळवून नेणारा ‘दिलवाला’ लग्नास नकार देतो. प्रेयसीच्या तक्रारीवरून त्याची अखेर कारागृहात रवानगी केली जाते. एखाद्या चित्रपटासारखे कथानक असलेली ही घटना सावली येथे रविवारी घडली.

ठळक मुद्देपळून गेल्यावर बदलले प्रियकराचे मन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रियकर-प्रेयसी लग्नाच्या आणाभाका घेतात. घरच्यांचा विरोध. अशातच प्रेयसीचे लग्न जुळते. लग्नाची तारीख जवळ येते. मनातील उत्कटता दोघांनाही स्वस्थ बसू देत नाही. दोघेही पळून जातात. मात्र नंतर अचानक ‘दुल्हनिया’ला पळवून नेणारा ‘दिलवाला’ लग्नास नकार देतो. प्रेयसीच्या तक्रारीवरून त्याची अखेर कारागृहात रवानगी केली जाते. एखाद्या चित्रपटासारखे कथानक असलेली ही घटना सावली येथे रविवारी घडली.गणेश मारोती शेंडे (२९) रा. सावली असे या प्रियकराचे नाव आहे. गणेश आणि येथील एका युवतीचे मागील पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते. गणेश नोकरीसाठी बाहेरगावी राहत होता तर ती सावलीत. दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे लग्न दुसऱ्या युवकाशी जुळविले. आता काही दिवसानंतर लग्नसोहळा संपन्न होणार होता. यादरम्यान, दोघांच्याही गाठीभेटी नव्हत्या. अशातच गणेशचे जुने प्रेम जागृत झाले आणि त्याने प्रेयसीला लग्नाची मागणी घातली. प्रेयसीनेही कसलाही विचार न करता त्याला होकार दिला आणि प्रियकराच्या सांगण्यानुसार दोघेही चंद्रपूरला पळून आले. मात्र अचानक काय झाले कुणास ठाऊक? प्रियकराने आपला निर्णय बदलवत अचानक लग्नास नकार दिला. यामुळे प्रेयसीला धक्का बसला. क्षणार्धात स्वप्नाचा चुराडा झाला. यादरम्यान, ज्याच्यासोबत लग्न जुळले होते, त्यानेही हात वर केले होते. परिणामी तिला व तिच्या कुटुंबीयांना फार मोठा धक्काच बसला.दोघेही एकाच समाजाचे असल्याने या प्रकरणी समाजाची बैठक बोलाविण्यात आली. मात्र यात काहीही तोडगा न निघाल्याने प्रकरण पोलीस ठाण्यात गेले. यावेळी ठाण्याबाहेर समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. ठाणेदार स्वप्नील धुळे, उपनिरीक्षक शेख, महिला पोलीस, नगराध्यक्ष, समाजातील काही मान्यवर तसेच दोघेही प्रियकर- प्रेयसी व उभयतांचे कुटुंबीय या सर्वाची बैठक घेण्यात आली. यात प्रियकराचे समुपदेशन करण्यात आले. मात्र प्रियकर लग्न न करण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम राहिला. त्यामुळे प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गणेश मारोती शेंडे (२९) याच्याविरुद्ध ३६६ कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा