केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृह, सामूहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार, वर्षात १५ दिवस निश्चित करून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सववलत जाहीर करण्याकरिता, जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. या आदेशानुसार सवलत दिलेल्या दिवसाकरिता सक्षम प्राधिकाऱ्याकडून परवानगी घेऊन अटी व शर्तीप्रमाणे ध्वनिक्षेपक ध्वनीवर्धकचा वापर करता येईल. ध्वनीवर्धक वापरासाठी वेळेत सूट देण्याबाबत इतर पाच दिवस आणि गणेश उत्सवाकरिता असलेल्या उर्वरित दोन दिवसांबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील. ध्वनी प्राधिकरण व पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याशी सल्लामसलत करून दहा दिवस निश्चित केल्याचेही जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी स्पष्ट केले.
वर्षभरातून १५ दिवस ध्वनिक्षेपक वापरता येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST