अवकाळी पाऊस : नुकसान भरपाई देण्याची मागणीचंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून मंगळवारी सायंकाळी पुन्हा वादळी पाऊस व गारपीट झाली. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ब्रह्मपुरी, नागभीड, चिमूर, बल्लारपूर, चंद्रपूर आदी तालुक्यात वादळी पाऊस व गारपीट झाली. या वादळी पावसाने अनेकांच्या झोपड्या कोसळल्या तर काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने रात्रभर वीज पुरवठा खंडीत होता.चिमूर तालुक्यात रबी पिकांना फटकाचिमूर : वादळी पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यातील हरभरा, गहू, तूर, सूर्यफूल या रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक घरांची पडझड झाली असून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचा व घरांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी आहे. शंकरपुरात दोन बकऱ्या ठार शंकरपूर : मंगळवारी झालेल्या वादळी पावसामुळे शंकरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील झाडे कोसळली. ही झाडे बाजूच्या रेवतकर यांच्या दुकानावर पडल्याने दुकान पूर्णपणे मोडकळीस आले. तर काही झाडे चिमूर मार्गावर पडल्याने काही तासासाठी वाहतूक थांबली होती. पाऊस व गारपिटीमुळे येथील दोन बकऱ्या मृत्युमुखी पडल्या तर झाडावरील बगळेही मृतावस्थेत आढळून आले.
गारपिटीच्या पावसाने लाखोंचे नुकसान
By admin | Updated: March 17, 2016 01:05 IST