चंद्रपूर : वडिलांनी मारले म्हणून घराबाहेर पडलेली मुलगी अवघ्या चार तासात पोलिसांनी शोधून काढली. डीबी पथकाच्या या कामगिरीमुळे चिंताग्रस्त झालेल्या त्या कुुटुंबाचा जीव भांड्यात पडला. ही घटना आज गुरुवारी घडली.येथील अष्टभुजा वॉर्डातील भगवानदास बंजारे यांनी आपल्या आठ वर्षीय मुलीला कुठल्यातरी कारणाने मारले. त्यानंतर नंदिणी रागाच्या भरात कुणाला काहीही न सांगता घरातून निघून गेली. बंजारे कुटुंबियांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र तिचा पत्ता लागला नाही. अखेर भगवानदास बंजारे यांनी रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली. येथील डीबी पथकाने आपले कर्तव्य बजावत अवघ्या चार तासात नंदिणीला शोधून काढले व कुटुंबियांच्या स्वाधीन केले. ही कामगिरी ठाणेदार संपत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
हरविलेली मुलगी चार तासांत सापडली
By admin | Updated: July 8, 2016 00:51 IST