शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
3
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
4
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
5
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
6
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
7
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
8
Live in Partner Murder: प्रेयसी रितिकाची गळा दाबून हत्या, दोन दिवस सचिन मृतदेहाजवळ झोपला; मित्रासोबत दारू प्यायला अन्...
9
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
10
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
11
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...
12
केंद्र सरकार ५ वर्षांत झाले मालामाल; कमावले दुप्पट, मिळाले २२ लाख कोटी 
13
Mumbai: भांडूप प्रकरणात धक्कादायक माहिती उघड, 'त्या' मुलीने आत्महत्या केली नाही तर...
14
डोळ्यात मिरची पावडर टाकली मग गळा दाबून केला खून; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केला मोठा कांड
15
Stock Market Today: ७९ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; रियल्टी आणि ऑटो सेक्टरमध्ये तेजी, कारण काय?
16
रेल्वे तिकीट बुकिंग, पॅन, ITR सह अनेक नियमांमध्ये बदल; एटीएमच्या वापरावरही शुल्क, जाणून घ्या काय काय बदललं
17
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
18
तू काय माझ्याकडे डोळे वटारून बघतो?; राज ठाकरेंनी विचारलं, स्टेजवर बोलावलं, सगळेच हसले!
19
काँग्रेसचे १५० नेते रशियाचे एजेंट, परदेशातून मिळायची फंडिंग; भाजपा खासदाराचा खळबळजनक दावा
20
'रामायण'च्या पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण, रणबीरची ऑनस्क्रीन लक्ष्मणासोबत गळाभेट; Video व्हायरल

स्वस्त धान्य दुकानदारांकडून लाभार्थ्यांची लूट

By admin | Updated: February 14, 2016 00:55 IST

तालुका अन्न पुरवठा विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायतस्तरावरील दक्षता कमिट्या फक्त कागदोपत्री आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष : दक्षता कमिट्या वाऱ्यावरआशिष देरकर गडचांदूर तालुका अन्न पुरवठा विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायतस्तरावरील दक्षता कमिट्या फक्त कागदोपत्री आहेत. सरकारी स्वस्त धन्य दुकानदारांवर कोणाचाही वचक नसल्याने स्वस्त धान्य केंद्राकडून लाभार्थ्यांची लुट सुरू आहे.गावातील शिधापत्रिका धारकांची लुट होऊ नये, अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शासकीय दराने गोरगरिबांना धान्य मिळावे, काळाबाजार होऊ नये म्हणून १५ आॅगष्ट २०१४ रोजी कोरपना तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीच्या आमसभेतून गावातील सरपंचाच्या अध्यक्षतेखाली व सचिव म्हणून तलाठी या पद्धतीने ११ सदस्यीय दक्षता समित्या नेमण्यात आल्या. आमसभेत दक्षता समितीचे कार्य समजावून सांगण्यात आले. मात्र दक्षता समित्यांच्या बैठका घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे वेळ नसल्यामुळे त्या फक्त कागदावर राहिल्या आहे. कोरपना तालुका अन्न पुरवठा विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांची लुट करीत आहे.शासन निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकानदाराला प्रत्येक महिन्याचे धान्य आल्यानंतर तशी सूचना दक्षता समितीला द्यायची असते. विक्री झाल्यावर दक्षता समितीचे प्रमाणपत्र घेऊन पुढच्या महिन्याच्या धान्याची उचल करायची असते. मात्र कोरपना तालुक्यातील जवळपास सर्वच दक्षता समित्या कुचकामी ठरल्या आहेत. कोरपना तालुक्यात एकूण ९६ स्वस्त धान्य केंद्र्र आहे. बोटावर मोजण्या इतके दुकानदार ग्राहकांना शासकीय भावात धान्य देऊन सोबत बिल देतात. मात्र बहुतांश दुकानदार आगाऊ रक्कम घेऊन धान्याची विक्री करीत असल्याने ग्राहकांना ते खरेदी करावी लागत आहे.कोरपना तालुक्यात अभय मुनोत यांनी अनेक गावांत जाऊन तेथील लोकांना धान्याचे शासकीय दर सांगून जनजागृती केली. गावातील लोकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी व तालुका निरीक्षक यांच्याकडे तक्रारी केल्याने काही दुकानदारांवर कारवाईसुद्धा झाली. मात्र पुरावे मिळूनदेखील अनेक ठिकाणी कारवाई करताना अधिकारी दोषींची बाजू घेत असल्याने गैरप्रकाराला चालना मिळत आहे.