शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांच्या लागल्या रांगा; केंद्राची चमू आलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST

या वर्षी मात्र कोणत्याही केंद्रावर कुठल्याही शेतकऱ्याला धान नेता येईल, असे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. तालुक्यात एकूण १० केंद्रे आहेत. कोठारांच्या क्षमतेत तफावत आहे. कोठारांत पोते ठेवताना दोन पोत्यांमध्ये अंतर ठेवावे. असे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. आठवडाभरात एक चमू पाहणी करण्याकरिता व मोजणी करण्याकरिता येणार होती. दीड महिन्याचा कालावधी लोटूनही केंद्र शासनाची चमू आली नाही.

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी :  कोणत्याही शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना आपला माल विकण्याचे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. तसेच धानाचे पोते ठेवताना त्यात अंतर ठेवावे. धानाची मोजणी करण्यासाठी केंद्र शासनाची चमू आठ दिवसांत येणार होती. अद्यापही मोजणी करण्यासाठी केंद्र शासनाची चमू आली नाही. त्यामुळे साठवणूक केंद्र फुल्ल झाले आहेत. अनेक केंद्रांबाहेर ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या असल्याने शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागते.दरवर्षी शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रावर धान विक्रीकरिता ऑनलाइन नोंदणी करावी लागत होती. या वर्षी मात्र कोणत्याही केंद्रावर कुठल्याही शेतकऱ्याला धान नेता येईल, असे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. तालुक्यात एकूण १० केंद्रे आहेत. कोठारांच्या क्षमतेत तफावत आहे. कोठारांत पोते ठेवताना दोन पोत्यांमध्ये अंतर ठेवावे. असे केंद्र शासनाने आदेशित केले आहे. आठवडाभरात एक चमू पाहणी करण्याकरिता व मोजणी करण्याकरिता येणार होती. दीड महिन्याचा कालावधी लोटूनही केंद्र शासनाची चमू आली नाही. पोत्यांमध्ये अंतर ठेवल्याने उंचावर पोते चढविता येत नाही. त्यामुळे कोठारात जागा फुल्ल झाली आहे. पोते ठेवावे कुठे, असा प्रश्न केंद्रचालकांना पडला आहे. धानखरेदीकरिता शेतकरी अनेक केंद्रांवर ट्रॅक्टर घेऊन आले आहेत. मात्र, जागा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अनेक केंद्रांवर चकरा माराव्या लागत आहेत. केंद्रांच्या बाहेर धान भरलेल्या ट्रॅक्टरच्या रांगा लागल्या आहेत. आधीच हवामानामुळे अत्यंत कमी पीक झाले. दोन पैसे जास्त मिळतात म्हणून आधारभूत केंद्रांवर धान विकण्यासाठी शेतकरी आले आहेत. मात्र, ताटकळत राहावे लागत असल्याने बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. 

त्या केंद्रावर मोजावे   लागते भाडेयेथील कुर्झा वाॅर्डातील शासकीय आधारभूत धानखरेदी केंद्रावर कोठाराचा किराया म्हणून क्विंटलमागे २५ रुपये शेतक-यांकडून घेण्यात येत आहे. तर, काट्यापर्यंत धान नेणे, दुसऱ्या पोत्यात पलटविणे, याकरिता मजुरी घेण्यात येते.

दोन पोत्यांमध्ये अंतर ठेवल्याने उंचावर पोते चढविता येत नाही. त्यामुळे कोठारात जागा अधिक गुंतते. केंद्र शासनाची चमू आठवडाभरात पाहणी करण्यासाठी येणार होती. मात्र, अद्यापही चमू आली नाही. - प्रभाकर सेलोकर,मुक्त प्रशासक, कृ.उ.बा. समिती़,ब्रह्मपुरी

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी