शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात सोमवारपासून देणार बहुप्रतिक्षित ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 05:00 IST

१६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. आरोग्यसेवक, कोरोना योद्धा,४५ वर्षांवरील व्याधिग्रस्त व ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणाचा हा टप्पा २५ एप्रिलपर्यंत १०० टक्के पूर्ण करण्याकरिता जिल्हाभरात ६९ केंद्र तयार केले. सर्व केंद्रांना कोविशिल्डचे ४० हजार डोज वितरित करण्यात आले. १३ मार्चला पहिल्यांदाच कोव्हॅक्सिनचे ४ हजार ८०० डोज जिल्ह्याला मिळाले.

ठळक मुद्देफक्त ४ हजार ८०० डोस उपलब्ध : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र केंद्र

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट व ऑक्सफर्ड व अ‍ॅस्ट्रोझेनिकने तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे डोज देणे सुरू आहे. राज्य सरकारने दुसऱ्या टप्प्यात हैदराबादची भारत बायोटेक व आयएमसीआर निर्मित ‘कोव्हॅक्सिन’ लसीचे ४ हजार ८०० डोज पाठविले. ही लस अत्यंत संवेदनशील असल्याने स्वतंत्र केंद्राचा शोध सुरू होता. अखेर चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात जिल्हाभरातून एकच विशेष केंद्र निश्चित झाले. सोमवारपासून या लसीचे डोज देणे सुरू होणार आहे.१६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरूवात झाली. आरोग्यसेवक, कोरोना योद्धा,४५ वर्षांवरील व्याधिग्रस्त व ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणाचा हा टप्पा २५ एप्रिलपर्यंत १०० टक्के पूर्ण करण्याकरिता जिल्हाभरात ६९ केंद्र तयार केले. सर्व केंद्रांना कोविशिल्डचे ४० हजार डोज वितरित करण्यात आले. १३ मार्चला पहिल्यांदाच कोव्हॅक्सिनचे ४ हजार ८०० डोज जिल्ह्याला मिळाले. हीे लस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेजची गरज लागते. २ ते ८ अंश सेल्सियस तापमानातच ही लस साठवून ठेवता येते. केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व बाजुंची तपासणी केल्यानंतर चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात ही लस टोचण्यासाठी प्रशासनाने नवीन स्वतंत्र केंद्र तयार केले.   

शुक्रवारपर्यंत ७३ हजार ३०४ जणांनी घेतला डोज जिल्ह्यातील ६९ केंद्रांवर शुक्रवारपर्यंत ७३ हजार ३०४ जणांनी कोविड १९ प्रतिबंधक डोस घेतला. यामध्ये पहिला डोस घेणारे १३ हजार ७७ हेल्थ केअर वर्कर, दुसरा डोज घेणारे ९ हजार ९९६ फ्रन्ट लाईन वर्कर,  ३१ हजार ७४२ ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्तांचा समावेश आहे.  

दोनही डोज एकाच केंद्रातकोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोज घेतल्यानंतर दुसरा बुस्टर डोज घेणे अत्यावश्यक आहे. कोविडशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोज याच लसीचा घ्यावा लागणार आहे. कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांनाही दुसरा बुस्टर डोज म्हणून हीच लस घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदीप गेडाम यांनी ‘लोकमत’ला सांगितले.  २४ हजार लस मिळणारलसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आले. उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. राज्य सरकारकडे पुन्हा कोविशिल्ड लसींची मागणी होती. सोमवारी जिल्ह्याला २४ हजार डोज उपलब्ध होणार आहे. त्यानंतर २३ नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाकडून जागेचा शोध घेतला जात आहे. दररोज दीडहजार नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे. केंद्रांची निश्चिती व अन्य सुविधा पूर्ण झाल्यानंतर लस वितरण केली जाणार आहे.लसीकरणात चंद्र्रपूरची आघाडीचंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील आरोग्य विभागाचे केंद्र व खासगी हॉस्पिटल्स मिळून शुक्रवारपर्यंत १९ हजार ६४८ जणांनी लस टोचून घेतली. यामध्ये ८ हजार ५९७ व्यक्ती ६० वर्षे व ४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त नागरिक आहेत. चंद्रपूर (ग्रामीण) तालुक्यातही ४ हजार ५२२ जणांची लस घेतली.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस