लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने ईएमआय भरण्यासाठी तिन महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे. ज्यांनी वाहन, घर व इतर बाबींसाठी कर्ज घेतले त्यांना याचा लाभ होईल. मात्र, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मासिक हप्ता भरण्यासाठी ३० जुनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.ग्रामीण भागातील शेतकरी आता संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना सक्षम करायचे असेल तर मासिक हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाची खरेदी करण्यासाठी राज्याने तातडीने नियोजन करावे. ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायासंदर्भात समस्या निर्माण झाली आहे. दूध संकलनाची व्यवस्था कोलमडली. जिल्हाधिकाºयांना सूचना देवून दूध संकलन पूर्ण करण्याची मागणीही माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केली आहे.निराधाराचे अनुदान व जनधन खात्यात जमा होणाºया अनुदानाची रक्कम काढताना संभाव्य गर्दी लक्षात घेता नागरिकांच्या रांगा न लावता. सानिटायझरचा वापर करून सहजपणे पैसे काढता यावे. यासाठी नियोजन करावे. ३१ मार्चपर्यंत परवान्यांचे नुतनीकरण केल्या जाते. संचारबंदीमुळे सर्व कार्यालय बंद आहे. ३१ मार्चपर्यंत नुतनीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे ही मुदत ३० जुनपर्यंत वाढवावी. वाहनांचा विमा भरण्याची मुदत १४ एप्रिलपर्यंत संपत आहे. त्यामुळे विमा भरण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत करण्याचे पत्रात म्हटले आहे.वनालगतच्या गावांमधील गवताची कापणी करून चारा उपलब्ध कराकोरोना व्हायरसमुळे राज्यातील संपूर्ण कामकाज बंद पडले. ग्रामीण व आदिवासी भागातील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याची राज्य शासनाची जबाबदारी आहे. शेतकºयांच्या हितासाठी राज्य शासनाने तातडीने धोरण तयार करावे. वनालगतच्या गावामध्ये जंगलातील गवताची कापणी करून पाळीव जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. जनावरांना पशुखाद्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने योग्य विचार करण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून जनावरांना चारा उपलब्ध होईल व ही श्रुखंला तुटणार नाही. या दृष्टीने संबंधितांना तात्काळ निर्देश द्यावेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन विविध उपाययोजना करीत आहेत. मात्र, सर्वसामान्य जनतेशी निगडीत महत्त्वपूर्ण प्रश्नही प्राधान्यांने निकाली काढावे, असेही मुख्यसचिवांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.
कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 06:00 IST
ग्रामीण भागातील शेतकरी आता संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना सक्षम करायचे असेल तर मासिक हप्ता भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाची खरेदी करण्यासाठी राज्याने तातडीने नियोजन करावे. ग्रामीण भागामध्ये दुग्ध व्यवसायासंदर्भात समस्या निर्माण झाली आहे. दूध संकलनाची व्यवस्था कोलमडली. जिल्हाधिकाºयांना सूचना देवून दूध संकलन पूर्ण करण्याची मागणीही माजी अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी केली आहे.
कर्जदार शेतकऱ्यांसाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : राज्याच्या मुख्य सचिवांकडे पत्राव्दारे केली मागणी