शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड्सला लागणार ४८ तासात टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 09:36 IST

सातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावले आदेश प्रदूषण रोखण्यात व्यवस्थापन अपयशी

राजेश भोजेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण सोडणाऱ्या कारखान्यांची संख्या मोठी आहे. लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला मिळालेल्या बंदच्या आदेशाने प्रदूषण ओकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य कंपन्यांना मोठी चपराक बसली आहे.चंद्रपूरपासून २६ कि.मी.वर घुग्घुस येथे हा कारखाना आहे. या कारखान्यात प्रदूषण नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा निकामी आहे. परिणामी कंपनीद्वारे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार जडले असून परिसरातील शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कंपनीद्वारे सोडण्यात येणारे पाणीही घातक असल्याची तक्रार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव व २०१४ मधील चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार महेश मेंढे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र या तक्रारीवर कोणत्याही हालचाली न झाल्याने महेश मेंढे यांनी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे धाव घेऊन प्रदूषणाची गांभिर्यता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर उपसभापती ठाकरे यांनी चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयाला चौकशीचे आदेश बजावले होते. या चौकशी अहवालात धक्कादायक वास्तव पुढे आले. यानंतर नीरीच्या माध्यमातूनही मोका चौकशी करण्यात आली. हा अहवालही आज दि. ७ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. यामध्येही कंपनीवर गंभीर ठपका ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारकर्ते महेश मेंढे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरूच होता. यासोबतच विविध पातळीवर सदर कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाच्या तक्रारीचा आधार घेऊन अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कंपनीला बंद करण्याचे आदेश काढावे लागले.तरच कंपनी सुरू करता येणारबंददरम्यान कंपनी व्यवस्थापनाने प्रदूषण रोखण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या उपायोजना केल्यानंतर कंपनी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून कंपनी सुरू करण्याचा परवाना दिला जाणार आहे.‘लोकमत’ने टिपली प्रत्येक घडामोडकंपनीतून होणाऱ्या प्रदूषणाची तक्रार झाल्यानंतर शासन व प्रशासनाच्या पातळीवर झालेल्या प्रत्येक घडामोडींची माहिती ‘लोकमत’ने सर्वप्रथम वाचकांपर्यंत पोहचविली हे विशेष.लॉयड्स कंपनीच्या राक्षसी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. शेतातील कापूस काळा पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. मात्र त्यांनी गांभिर्याने न घेतल्याने विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी ही तक्रार अतिशय गांभिर्याने घेतल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाने अखेर कंपनीला ४८ तासात बंद करण्याचे आदेश बजावले आहे. प्रदूषणावरुन एखाद्या कंपनीला बंद करण्याची पाळी येत असेल, तर अन्य कंपन्यांनीही यापासून धडा घेण्याची गरज आहे.- महेश मेंढे, तक्रारकर्ते व सचिव चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी, चंद्रपूर.

टॅग्स :pollutionप्रदूषणGovernmentसरकार