शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीगुड्याच्या नशिबी उपेक्षिताचं जीणं

By admin | Updated: September 9, 2015 00:54 IST

आदिवासी बांधवाच्या विकासासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबवित

शंकर चव्हाण जिवतीआदिवासी बांधवाच्या विकासासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनस्तरावरून विविध योजना राबवित असल्याचा दावा शासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र जिवती तालुक्यातील मच्छीगुड्यातील नागरिकांना विकास म्हणजे काय, हे अजूनही या वस्तीला माहित नाही. विकासाची कुठलीच योजना आजवर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. गावात जायला धड रस्ता नाही. प्यायला योग्य पाणी नाही. स्वातंत्र्याच्या अनेक वर्षानंतरही दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या समाजाला घरकुल दिले नसल्याने आजही येथील नागरिक पडक्या घरात जीवन जगत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. प्रस्तुत प्रतिनिधी या गावात भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन केले असता, गावकऱ्यांनी ‘लोकमत’पुढे आपल्या व्यथा मांडल्या.जिवती तालुक्यातील भारी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या मच्छीगुडा गावात १२ घरांची वस्ती आहे. जेमतेम ६० लोकसंख्या असलेल्या या गावाचे नाव तालुक्याच्या नकाशावर असले तरी अंगणवाडीशिवाय कुठलीच शासकीय योजना गावात पोहोचली नाही. गेल्या चार वर्षांपूर्वी या वस्तीत विजेचे खांब उभे करण्यात आलेत, मात्र अद्यापही विजेचा दिवे लावण्यात न आल्याने गावकऱ्यांना रात्रीच्या सुमारास अंधाराचा सामना करावा लागत आहे. जीवती पंचायत समितीच्यावतीने येथील लोकांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पिण्यास मिळावे याकरिता हातपंप लावण्यात आले. मात्र तेही अल्प कालावधीतच बंद पडले. त्यामुळे त्या नागरिकांना नाल्यावरच्या झऱ्यातील दूषित पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे. राहायला योग्य घर नाही, जायला धड रस्ता नाही, हे खरे गावकऱ्यांचे दुखणे आहे. या मूलभूत प्रश्नांसाठी गावकऱ्यांचा अनेक वर्षांपासूनचा लढा सुरू आहे. पण गेली पन्नास वर्षे वेदनेचे हुंकार देत जगणाऱ्यांचा आक्रोश आजवर राज्यकर्त्यांच्या कानी कधी पोहचलाच नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये शासन प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आम्ही कुठवर असं उपेक्षिताचं जीवन जगायचं, असा प्रश्न मच्छिगुडा वस्तीत राहणाऱ्या नागरिकांनी उपस्थित केला. खांब आहेत; पण वीज पुरवठा नाहीमच्छीगुड्यातील अंधार दूर व्हावा, यासाठी वीज वितरण कंपनीने गेल्या चार वर्षापूर्वी विद्युत खांब उभे केले. काही दिवस विजेचा प्रकाशही गावात दिला. मात्र त्यानंतर मात्र वीज पुरवठा बंद झाला, तो अद्यापही सुरू करण्यात आला नाही. त्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य आहे. अनेक वेळा गावकऱ्यांनी ग्रामसेवकापुढे समस्या मांडण्याचा प्रयत्न केला; पण कुणीही लक्ष दिले नसल्याने आजही नागरिकांना अंधाराचे जीवन जगावे लागत आहे. तातडीने वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी होत आहे.