शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम सेवाज्येष्ठता यादीत घोळ

By admin | Updated: April 10, 2017 00:46 IST

आरटीई अ‍ॅक्टनुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने इयत्ता सहावी ते आठवीला शिकविण्यासाठी विषय शिक्षकांच्या

विषय शिक्षक : नव्याने यादी प्रसिद्ध करण्याची मागणी करणारचंद्रपूर : आरटीई अ‍ॅक्टनुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने इयत्ता सहावी ते आठवीला शिकविण्यासाठी विषय शिक्षकांच्या पदस्थापनेची कार्यवाही सुरु केलेली आहे. विषय शिक्षक या पदाकरिता विकल्प दिलेल्या पदविधर सहायक शिक्षक तसेच अपात्र उच्च श्रेणी मुख्याध्यापकांची अंतिम सेवा जेष्ठता यादी नुकतीच ७ एप्रिलला प्रसिद्ध केलेली असून या यादीमध्ये प्रचंड चुका असल्याने शिक्षकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे.शिक्षण विभागाने ७ एप्रिलला गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे एक पत्र काढून यादीत काही त्रुट्या असल्यास दुरुस्तीसह १० एप्रिल २०१७ पर्यंत शिक्षण विभाग चंद्रपूर येथील कार्यालयात सादर करण्याविषयी म्हटलेले आहे. मात्र ८ आणि ९ एप्रिलला कार्यालायाल सुटी असल्यामुळे बऱ्याच शिक्षकांना या यादी संदर्भात माहिती नाही. ज्या शिक्षकांनी व्हॉटसपवर यादी पाहिलेली आहे, त्यात प्रामुख्याने काही शिक्षकांच्या रुजू तारखेत तसेच जन्मतारखेत चुका असल्याचे तसेच विषय शिक्षक म्हणून कार्यरत असतानाही काहींची नावे नव्याने घेण्यात येणाऱ्या यादीत समाविष्ठ केलेली आहेत. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे अनेक शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मरा प्राथ शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.डी. पोटे, सचिव किशोर उरकुंडवार यांचेसह मारोती जिल्हेवार, गजानन कहुरकक, जगदीश दुधे, विद्याचरण गोल्हर, अशोक टिपले, मारोती आनंदे, नामदेव कावळे, अनिल झाडे, संजय बट्टे, सुरेश जिल्हेवार, लक्ष्मण सोयाम, सुनील मामीडवार, विजय सातपुते, जहीर खान, नारायण तेल्कापल्लीवार, शंकर गोरे, बाळकृष्ण मसराम, काकासोहब नगारे, डेकाटे, राजेंद्र चांभारे, विद्या सयाम, प्रमादे बाविसकर, विनोद बारसागडे आदींनी नाराजी व्यक्त केली असून नव्याने यादी प्रसिद्ध करण्याची मागणी करणार असल्याचे संघटनात्मक पत्रकार म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)