शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या सहकार्याशिवाय दारूबंदी अशक्य

By admin | Updated: March 13, 2017 00:43 IST

जिल्ह्यात झालेल्या दारूबंदीच्या मोहिमेत जिल्हा पोलीस प्रशासन उत्तमरीत्या कार्यरत आहे. पोलीस आपल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन प्रामाणिकरीत्या कर्तव्य पार पाडत आहे.

विशेष पोलीस महासंचालक : मूल पोलीस स्टेशनला भेटमूल : जिल्ह्यात झालेल्या दारूबंदीच्या मोहिमेत जिल्हा पोलीस प्रशासन उत्तमरीत्या कार्यरत आहे. पोलीस आपल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन प्रामाणिकरीत्या कर्तव्य पार पाडत आहे. यावेळी त्यांच्या जीवाला धोकाही आहे. दारूबंदीच्या काळात जिल्ह्यात अनेक घटना अशा घटना घडल्या आहेत.दारूबंदी योजना यशस्वी होण्यासाठी पोलीस प्रशासनातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकारी कटीबद्ध आहे. परंतु काही मंडळी दारूबंदीच्या विधायक योजनेला काळीमा फासण्याचा प्रयत्न करीत आहेत. याविषयी खंत व्यक्त करताना दारूबंदीच्या चळवळीत पोलीस प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य करावे, असे आवाहन नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महासंचालक प्रतापसिंग पाटणकर यांनी केली.शासकीय कामानिमित्त विशेष पोलीस महासंचालक प्रतापसिंग पाटणकर यांनी नुकतीच मूल पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी केली. यादरम्यान झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात तालुका पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांचेसह उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचे ठाणेदार उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत विशेष पोलीस महासंचालक पाटणकर यांनी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कामगिरीबाबत चर्चा करताना पत्रकार हा आरसा असून चौथा स्तंभ म्हणून लोकशाही प्रणालीत समाज सुधारणेसाठी त्यांचा सहभाग मोलाचा आहे. जनता, राजकारणी, पत्रकार आणि पोलीस या चौघांनी प्रामाणिकरित्या काम केल्यास विघातक शक्तीचा बिमोड होवून समाजात आनंद देमारे नंदनवन निर्माण होवू शकते. असा आशावाद व्यक्त केला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे, उपाध्यक्ष भोजराज गोवर्धन, सचिव विनायक रेकलवार, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण नखाते, प्रा. चंद्रकांत मनियार, गुरूदास गुरनुले, राजू गेडाम, रमेश माहुरपवार, दीपक देशपांडे, अशोक येरमे, युवराज चावरे, गंगाधर कुनघाडकर, शशीकांत गणवीर आदी उपस्थित होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संजय मारकवार यांचे नेतृत्वात बाजार समितीचे सभापती घनश्याम येनूरकर, संचालक राकेश रत्नावार, शांताराम कामडी, माजी नगरसेवक मोतीलाल टहलियानी आणि बाबा अझीम यांनीही पोलीस महासंचालक पाटणकर यांची भेट घेवून स्वागत केले. (तालुका प्रतिनिधी)