शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

नागरिकांनीच केली लिकेज दुरुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 22:51 IST

शहराला विविध प्रभागात खासगी कंपनीकडून पाणी पुरवठा केला जाते. मात्र अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत पाणी पुरवठा कंपनीकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्षच केल्याने स्थानिक नागरिक व नगरसेवक पप्पु देशमुख यांनी पुढाकार घेत लिकेज दुरूस्त केले. त्यामुळे पाणी पुरवठा कंपनी व मनपा प्रशासनाप्रति नागरिकांत रोष पसरला आहे.

ठळक मुद्देपाणी पुरवठा कंंत्राटदाराचे दुर्लक्ष : गळतीमुळे गढूळ पाण्याचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराला विविध प्रभागात खासगी कंपनीकडून पाणी पुरवठा केला जाते. मात्र अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत पाणी पुरवठा कंपनीकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्षच केल्याने स्थानिक नागरिक व नगरसेवक पप्पु देशमुख यांनी पुढाकार घेत लिकेज दुरूस्त केले. त्यामुळे पाणी पुरवठा कंपनी व मनपा प्रशासनाप्रति नागरिकांत रोष पसरला आहे.रविवारी सकाळी ७ वाजता वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांना दत्तनगर परिसरातील नागरिकांनी फोन करून मागिल अनेक महिन्यांपासून दत्तनगरमध्ये पाण्याचा अनियमित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार केली. पाईपलाईन लिकेज असल्याने गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी सांगितले. तेव्हा नगरसेवक पप्पु देशमुख व नागरिकांनी नागपूर मार्गावरील अंजीकर शोरूम जवळील पुलाखाली असलेला लिकेज शोधून काढला. याबाबत नागरिकांनी उज्वल कन्स्ट्रक्शन या पाणी पुरवठा कंपनीला फोन करून माहिती दिली. मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. रविवार दिवस असल्यामुळे तांत्रिक कामगार सुद्धा त्वरित येणार नाहीत, याची कल्पना नागरिकांना आली.त्यामुळे नगरसेवक पप्पु देशमुख व प्रभागातील नागरिक दुर्गेश गिरडकर, गजानन झोडे, केशव दारवणकर, महेंद्र राळे, गुलाबराव पुनवटकर, विश्वनाथ नक्षिणे, खेमराज चिवडे त्यांनी स्वत:च लिकेज दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. दुर्गेश गिरडकर, गजानन झोडे यांनी आपल्याकडील पाईप दुरूस्तीचे साहित्य आणले. सर्वजण नाल्यात उतरले आणि ज्या ठिकाणी पाईपलाईन लिकेज होती, त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू केले.अशाप्रकारे नागरिकांनी व नगरसेवकाने स्वत: पुढाकार घेऊन लिकेज बंद केला. लिकेजमुळे विनाकारण पाणी वाया जात असल्याची माहिती दिल्यानंतरही उज्वल कंस्ट्रक्शन कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्ते महेंद्र राळे यांनी केला आहे. शहर अजून पाणीटंचाईच्या धोक्यातून सावरलेला नसताना अशा समस्यांची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनही याकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.मनपा व पाणी पुरवठा कंपनीच्या कारभारावर प्रभागातील नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात असून पालिकेने वेळीच याकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.मनपाचे होतेय जाणिवपूर्वक दुर्लक्षशहरात अजूनही एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दत्तनगर व वडगाव प्रभागातील अनेक ठिकाणी अनियमित पाणी पुरवठा होतो. नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या लेखी तक्रारी महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार देण्यात आल्या. आमसभेमध्येही हा प्रश्न वेळोवेळी उचलून धरला. परंतु, मनपा प्रशासन पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीविरूद्ध कठोर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळत आहे. विवेकानंदनगर, लक्ष्मीनगर, पीडब्ल्यूडी कॉर्टर, दत्तनगर, सिव्हील लाईन परिसरातील नागरिकांकडून अनेकवेळा लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र मनपा याकडे दुर्लक्षच करीत असल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे. आतातरी पालिकेने पाणी समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी त्यांनी व वॉर्डातील नागरिकांनी केली आहे.