शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पाण्याच्या बाटलीखाली दारूची तस्करी, चार जण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 05:00 IST

 नागपूरवरून खांबाडा मार्गे एक चार चाकी वाहन आणि त्याच्या समोर पायलटिंग करणारी एक कार चंद्रपूरकडे दारूसाठा नेत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खंबाडा चेक पोस्ट गाठले आणि त्या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी केली असता सर्वप्रथम हुंडाई कंपनीची कार क्रमांक एम. एच. ४९ बिके ३०३५ समोरून येताना दिसली. पोलिसांनी ते वाहन अडविले आणि त्याची तपासणी केली असता कार चालक नीलेश सुखदेव सलोटे याच्यासह कारमधून एक लाख रुपये नगदी आणि महागडे मोबाइल ताब्यात घेतले. 

ठळक मुद्देवरोऱ्यात दोन वाहनांसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असतानासुद्धा अवैध दारू विक्रेते नवनवीन शक्कल लढवून अवैध दारू मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात पुरवठा करीत आहेत.  वरोरा पोलिसांनी बुधवारी एका कारवाईत २९ लाख ९६ हजार रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल जप्त केला. नागपूरवरून खांबाडा मार्गे एक चार चाकी वाहन आणि त्याच्या समोर पायलटिंग करणारी एक कार चंद्रपूरकडे दारूसाठा नेत असल्याची माहिती वरोरा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी खंबाडा चेक पोस्ट गाठले आणि त्या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांसह नाकाबंदी केली असता सर्वप्रथम हुंडाई कंपनीची कार क्रमांक एम. एच. ४९ बिके ३०३५ समोरून येताना दिसली. पोलिसांनी ते वाहन अडविले आणि त्याची तपासणी केली असता कार चालक नीलेश सुखदेव सलोटे याच्यासह कारमधून एक लाख रुपये नगदी आणि महागडे मोबाइल ताब्यात घेतले.  त्यापाठोपाठ लेलँड कंपनीचे चार चाकी वाहन क्रमांक एमएच ०४ एटी २७०४ पोलिसांना येताना दिसले.  त्या वाहनाची तपासणी केली असता वरच्या भागात बिसलेरी पाण्याच्या बाटल्या तर आतमध्ये देशी दारूने भरलेल्या १५० पेट्या  पोलिसांना आढळल्या. बिसलेरी बाटल्यांचा देखावा करून ही अवैध दारू आरोपी चंद्रपूरकडे नेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणी राहील सलीम खान पठाण,  शेख जुबेर शेख गुलाल आणि रंजीत चंद्रमणी मेश्राम (सर्व राहणार नागपूर) यांना अटक केली. पोलिसांनी या प्रकरणी ८ लाख ७० हजार रुपयांची दारू व मुद्देमालासह २९ लाख ९६ हजार रुपयांचा माल जप्त केला. पोलीस हवालदार प्रदीप पाटील यांनी फिर्याद नोंदवली, तर उपविभागीय पोलीस अधिकारी  नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, प्रदीप पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.  

दारू मालकाचे नाव लपविण्यासाठी पोलिसांचे हात ओले?ही दारू चंद्रपुरातील एका बड्या नेत्याची असल्याची चर्चा दारू पकडल्यानंतर सुरू झाली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. ही दारू ते चंद्रपूरला घेऊन जात असल्याचे सांगत आहेत. ही दारू कोणाकडे चालली हेदेखील वरोरा पोलिसांना माहिती असताना पोलीस दारू मालकाचे नाव लपवित असल्याचे समजते. नाव लपविण्यासाठी वरोरा पोलिसांचे हात ओले केल्याची चर्चा आहे.

 

टॅग्स :liquor banदारूबंदी