देवाडा : राजुरा तालुक्यातील देवाडा सिद्धेश्वर आरटीओ चेक पोस्टच्या काही अंतरावर अवैधरित्या दारु तस्करी करणारे चार चाकी वाहन अचानक उलटले. ही घटना आज गुरुवारी सकाळी ६ वाजता घडली. एमएच-४० ए- ४८१९ असा या वाहनाचा क्रमांक आहे. हे वाहन भरधाव वेगाने चेक पोस्ट मार्गाने जात होते. राजुरा ते लक्कडकोट या महामार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण व चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. रस्त्याच्या कडेला गिट्टीचे ढिगारे पडून आहेत. अशातच दारु तस्करी करणारे हे वाहन या मार्गाने भरधाव जात असताना अचानक वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन गिट्टीच्या ढिगाऱ्यावर जावून उलटले. वाहन तीन- चार वेळा पलटी होवून वाहन रस्त्याच्या कडेला थांबले. या चार चाकी टोयटो वाहनामध्ये असलेल्या दारुच्या पेट्या रस्त्यावर पसरल्या. घटनेनंतर नागरिकांची घटनास्थळी गर्दी झाली. या वाहनामध्ये दोन जण होते, अशी माहिती मिळाली. त्यांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालय येथे भरती करण्यात आले आहे. (वार्ताहर)
दारू तस्करी करणारे वाहन उलटले
By admin | Updated: April 7, 2017 00:52 IST