शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गावतलावातून गाळाचा उपसा

By admin | Updated: June 6, 2017 00:36 IST

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गावतलावातून गाळ उपसण्याचे अभियान सुरु करण्यात आले. कोरपना येथे तहसीलदारांच्या हस्ते त्यांचा प्रारंभ करण्यात आला.

कोरपना येथे कार्यक्रम : शेतीसाठी गाळ वापरण्याचे आवाहनलोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गावतलावातून गाळ उपसण्याचे अभियान सुरु करण्यात आले. कोरपना येथे तहसीलदारांच्या हस्ते त्यांचा प्रारंभ करण्यात आला.कोरपना तालुक्याच्या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व काळातील मालगुजारी तलाव (मामा) आहेत. मात्र अतिक्रमण व गाळ साचल्याने त्या तलावात पाण्याचा साठा तयार होत नाही. परिणामी गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. या तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ आणि बेशरम झाडाची रोपे झाल्याने शिंगाडा किंवा मासेमारीसाठी तो उपयोगात येत नाही. तलावाचे खोलीकरण करणे व गाळ उपसा व्हावा म्हणून जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडून जलसंधारण विभागाला तलाव हस्तांतर करावा, अशी मागणी नगरसेवक सुहेल आबिद अली यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. आ. अ‍ॅड. संजय धोटे यांनी सतत पाठपुरावा करुन शासनाचे लक्ष वेधले. गावकऱ्यांची मागणी लक्षात घेता अधीक्षक अभियंता पाटबंधारे विभाग यांनी खोलीकरण कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. या गावतलावातील बेशरम झाडांचे निर्मूलन व ‘गावयुक्त गाळमुक्त शेत’ करण्यासाठी सामाजिक दायित्व निधी अंतर्गत अल्ट्राटेक कंपनीकडून जेसीबीद्वारे गाळ उपसा करण्यात येत आहे. हा गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापर करावा, असे आवाहन तहसीलदार हरीश गाडे यांनी केले.यावेळी संवर्ग विकास अधिकारी डॉ. संदीप बोन्सीकर जनसत्याग्रह संघटनेचे आबिद अली, सभापती शाम रणदिवे, नारायण हिवरकर, नगरसेवक अशोक डोहे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.