शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कामगारांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 00:08 IST

वेकोलि वणी क्षेत्रातील सुंदरनगर वसाहतील कामगारांच्या क्वार्टरच्या भिंती पडल्या आहेत. अनेकांच्या क्वार्टरच्या भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. भिंत केव्हा पडेल, याचा नेम राहिला नाही. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि याकडे लक्ष द्यायला तयार नाही.

ठळक मुद्देवेकोलि कामगार वसाहतीतील घरे मोडकडीस : भिंतीला पडल्या भेगा

गजानन साखरकर ।लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : वेकोलि वणी क्षेत्रातील सुंदरनगर वसाहतील कामगारांच्या क्वार्टरच्या भिंती पडल्या आहेत. अनेकांच्या क्वार्टरच्या भिंतीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. भिंत केव्हा पडेल, याचा नेम राहिला नाही. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि याकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे वेकोलि कामगार व त्यांच्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात आला आहे.याशिवाय या वसाहतीतील नाल्यांची दुरूस्ती व साफसफाई नियमित होत नसल्याने कामगार कुटुंबीयांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. वेळोवेळी क्वार्टर व नाली दुरूस्ती आणि साफसफाई करण्याची मागणी कामगारांकडून होत असली तरी व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगारांकडून होत आहे.वेकोलिच्या निलजई कोळसा खाण क्षेत्रातील सुंदरनगर कामगार वसाहत आहे. तेथील क्वार्टरच्या भिंती कोसळत आहे. अनेक क्वार्टरच्या भिंतींना ठिक ठिकाणी तडे गेलेले आहेत. क्वार्टरच्या भिंती केव्हा कोसळेल, याचा नेम नाही. दरवाजे खिडक्या तुटलेल्या आहे. अशाही अवस्थेत कामगार आपल्या कुटुंबासह याच घरात राहत आहे. दिवसा किंवा रात्री झोपताना केव्हा दुर्घटना घडेल, हे सांगता येत नाही.याशिवाय नाल्यांची दुरूस्ती होत नसल्याने अनेक ठिकाणी पाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कामगारांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे.यापूर्वी या कामगार वसाहतमधील क्वार्टरची पडझड झाली. मात्र सुदैवाने कामगार व त्याचे कुटुंबीय बचावले. क्वार्टरची दुरूस्ती व्हावी, पाणी वाहून नेणाऱ्या नाल्याची दुरूस्ती व्हावी, अशी मागणी कामगारांकडून वेळोवेळी होत आहे. या ठिकाणी कार्यरत कामगार संघटनांचे पदाधिकारीदेखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप कामगाराकडून होत आहे.स्वखर्चाने दुरुस्तीघराच्या भिंती केव्हाही कोसळून अपघात होऊ शकतो. त्यामुळे कामगार व त्याच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वारंवार तक्रारी करूनही वेकोलि याकडे लक्ष देत नसल्याने काही कामगारांना नाईलाजाने स्वत: आपल्या खर्चाने क्वार्टर ची दुरूस्ती करावी लागत आहे. सध्या सुंदरनगर परिसरात वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याने कामगारांना कर्तव्यावर ये-जा करतानाही जीव धोक्यात घालावा लागत आहे. एकूणच आता कामगारांच्या या ज्वलंत प्रश्नाकडे वेकोलिने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.