शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जीवन संपले, तरीही मिळाला नाही न्याय..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2022 05:00 IST

मरारमेंढा येथे बनकर यांची गट न. १०१ व १०२ शेती आहे. त्यांच्या शेताच्या बाजूने (छोटा नाला) वाही आहे. पावसाचे अतिरिक्त पाणी यातून वाहून जाते. या जमिनीच्या खालच्या भागात शामराव गायकवाड यांची शेती आहे. त्यांनी वाहीच्या जागेत ट्रॅक्टरने माती ओढून वाही बुजविली. त्या जागेवर ते पीक घेत आहेत. त्यामुळे बनकर यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पिकाचे मोठे नुकसान दरवर्षी होत आहे.

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी :  तालुक्यातील कालेता येथील मृत श्रीधर बनकर यांची शेती मरारमेंढा  येथे आहे. एकाने पाणी वाहून जाणारा नाला माती टाकून बुजविला. त्यामुळे बनकर यांच्या शेतात दरवर्षी पाणी साचून धान पिकाचे नुकसान होते. याबाबत  २०१६ पासून पत्रव्यवहार करून शासनाकडून न्याय मिळावा, ही त्यांची अपेक्षा होती. त्यांचा मृत्यू मार्च २०२१ मध्ये झाला. त्यांची वारसदार बहीण मंदा डांगे यांनीदेखील त्यांच्यानंतर पत्रव्यवहार करून शासनाकडून न्यायाची अपेक्षा केली. मात्र, अद्याप न्याय मिळाला नाही. शेतकऱ्याचे जीवन संपले. मात्र, शासनाकडून न्याय मिळाला नाही. त्यामुळे दरवर्षी मोठे नुकसान सहन करावे लागते. मरारमेंढा येथे बनकर यांची गट न. १०१ व १०२ शेती आहे. त्यांच्या शेताच्या बाजूने (छोटा नाला) वाही आहे. पावसाचे अतिरिक्त पाणी यातून वाहून जाते. या जमिनीच्या खालच्या भागात शामराव गायकवाड यांची शेती आहे. त्यांनी वाहीच्या जागेत ट्रॅक्टरने माती ओढून वाही बुजविली. त्या जागेवर ते पीक घेत आहेत. त्यामुळे बनकर यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पिकाचे मोठे नुकसान दरवर्षी होत आहे. अशी तक्रार २०१६ मध्ये श्रीधर बनकर यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली होती. त्यांचा मृत्यू २२ मार्च २०२१ ला झाला. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही.त्यानंतर त्यांचे वारसदार मंदा डांगे यांनी उपअभियंता जिल्हा परिषद उपविभाग, ब्रम्हपुरी, तहसीलदार यांच्याकडे २०२१ ला तक्रार केली; तर २० जानेवारी २०२२ ला तहसीलदार यांच्याकडे लेखी पत्र देऊन ५ - ६ लक्ष रुपयांचे झालेले नुकसान तसेच भविष्यात होणारी नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. भावाच्या मृत्यूनंतर वारसदार बहिणीला शासनाकडून न्याय मिळेल काय? असा प्रश्न निर्माण होत आहे.

मंडल अधिकाऱ्यांनीही दिला अभिप्रायमंडल अधिकाऱ्यांनी  पंचनामा करून अर्जदाराचे नुकसान होत असल्याचे, गैरअर्जदार यांच्या शेताजवळ वाहीची रुंदी कमी असल्याचे तसेच वाहीत झुडुपे  वाढली असल्याचा अभिप्राय दिला. तसेच गैरअर्जआर यांच्या शेताची मोजणी करण्याचेही डिसेंबर २०२१ च्या लेखी पत्रात नमूद आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प