शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विकल्यास परवाना होईल निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 15:24 IST

Chandrapur : अन्न व औषध प्रशासनातर्फे केली जाते तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विक्रीवर बंदी आहे; परंतु या नियमांचे उल्लंघन करून अनेक औषध विक्रेते औषधांची विक्री करतात. गत वर्षभरात अशा १४ जणांवर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने कारवाई करत परवाना निलंबित केला आहे. त्यामुळे त्यांना विना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देणे चांगलेच भोवले आहे.

सर्दी-खोकला किंवा इतर कोणताही आजार असो, अनेक जण डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय औषध विक्रेत्याकडे जाऊन औषधी घेत त्याचे सेवन करतात; परंतु डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कुठलेही औषधी देणे हे नियमबाह्य आहे. त्यात अशाप्रकारे औषधी खाल्ल्याने रुग्णांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती असते. काही औषधांच्या साईड इफेक्टमुळे गंभीर परिणाम देखील होण्याची शक्यता असते.

त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी औषध विक्रेत्यांकडील व्यवहारांची, कागदपत्रांची तपासणी केली जाते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनाशिवाय औषधी देणे असो किंवा इतर नियमांचे उल्लंघन करणे असो अशात कोणी औषध विक्रेता दोषी आढळला तर त्याचा परवाना निलंबित करून मेडिकल चालकावर कारवाई करण्यात येते. चंद्रपूरचे सहायक आयुक्त (औषधी) मनीष चौधरी यांच्या नेतृत्वात वर्षभरात १४ परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

वर्षभरात १४ मेडिकलचे परवाने केले निलंबित अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने औषध विक्रेत्यांच्या दप्तरांची तपासणी केली जाते. कायद्याचे उल्लंघन केलेले आढळले तर कारवाई केली जाते. मागील वर्षभरात विना प्रिस्क्रिप्शन औषधी देणाऱ्या १४ जणांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी देण्यास मनाई डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधी विक्री करण्यास औषध विक्रेत्यांना कायद्याने मनाई करण्यात आलेली आहे. असे कृत्य केले तर कारवाई होते

"अन्न व औषध विभागामार्फत मेडिकल दुकानाची तपासणी केली जाते. विना प्रिस्क्रिप्शन वा इतर नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास कारवाई केले जाते. मागील वर्षी विना प्रिस्क्रिप्शन औषधे देणाऱ्या १४ मेडिकलचे परवाने रद्द केले." - मनीष चौधरी, सहायक आयुक्त (औषधी), चंद्रपूर

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर