चंद्रपूर : स्कूलबमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी शासनाने विविध नियम आखून दिले आहेत. मात्र या नियमांचे अनेक शाळा-महाविद्यालये सर्रास उल्लंघन करीत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना असुरक्षित प्रवास करावा लागत असून एखाद्यावेळी अनुचित घटनासुद्धा घडू शकते. स्कूल बस संदर्भातील नियमांची माहिती व्हावी, नियमानुसारच बस चालवाव्या, यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापकांना स्कूलबससंदर्भातील नियमांचे धडे देण्यात आले. कार्यशाळेचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, वाहतूक पोलीस विभाकडून करण्यात आले होते. जिल्ह्यात दोनशेच्यावर स्कूलबस आहे. मात्र बहुतांश बस शासनाने ठरवून दिलेल्या नियमात चालविल्या जात नाहीत. यामुळे अनेकवेळा विद्यार्थ्यांना अपघातालाही समोर जावे लागते. अपघात टाळता यावे, विद्यार्थ्यांचा सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी प्रथम मुख्याध्यापक, प्राचार्यांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अहिरे यांनी मुख्याध्यापकांना स्कूलब् ाससंदर्भातील वाहतूक, बसमधील यंत्रणा, अडचणीच्या वेळी मदत, परिवहन समितीची बैठक, अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार पेटी आदींबाबत पॉवर प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. या नियमानुसार बस चालविल्यास अपघात टाळता येऊ शकतो. मात्र यासाठी संबंधित संस्थाचालक, शिक्षक तसेच शाळेतील परिवहन समितीची मानसिकता असणे गरजेचे आहे. (नगर प्रतिनिधी)
मुख्याध्यापकांनी गिरविले स्कूल बस नियमांचे धडे
By admin | Updated: July 12, 2014 01:00 IST