शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियमांचे पालन करुन 288 शाळेत ज्ञानार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 05:00 IST

कोरोनामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी १५ जुलैपासून जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ६१७ शाळेपैकी पहिल्या दिवशी म्हणजेच १५ जुलैला १५२ शाळा सुरू झाल्या. त्यानंतर दररोज शाळा सुरु होण्याच्या संख्येत वाढ होत आहे.

ठळक मुद्देउपस्थितीमध्ये होतेय वाढ : विद्यार्थी आले शैक्षणिक प्रवाहात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाल्याने १५ जुलैपासून जिल्ह्यातील आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू झाल्या आहेत. सद्यस्थितीत कोरोना नियमांचे पालन करून २८८ शाळेत ज्ञानार्जन करण्यात येत आहे. याला विद्यार्थ्यांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.कोरोनामुळे सर्व शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र दुसरी लाट ओसरल्यानंतर रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी १५ जुलैपासून जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यात एकूण ६१७ शाळेपैकी पहिल्या दिवशी म्हणजेच १५ जुलैला १५२ शाळा सुरू झाल्या. त्यानंतर दररोज शाळा सुरु होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. आता  जिल्ह्यातील २८८ शाळा सुरू असून १५ हजार ७९ विद्यार्थी शाळेत ज्ञानार्जन करीत आहेत. 

विद्यार्थ्यांच्या संख्येत होतेय वाढकोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्यशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने १५ जुलैपासून चंद्रपूर जिल्ह्यातील १५२ शाळा सुरू झाल्या. त्यानंतर दररोज शाळा सुरू होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. ३० जुलैला जिल्ह्यातील ६१७ शाळांपैकी २८८ शाळा सुरू झाल्या आहेत. एकूण पटसंख्या एक लाख २८ हजार ३५ पैकी १५ हजार ७९ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. 

विद्यार्थी मजेत पालक चिंतेत...

दोन वर्षांपासून शाळा बंद होती. त्यामुळे मित्रमंडळीची भेट होत नव्हती. तसेच कोरोनाची दहशत असल्याने घराबाहेर पडतासुद्धा येत नव्हते. आता शाळा सुरू झाल्याने सर्वांसोबत खेळता येते.-रोहित गेडाम, विद्यार्थी

सतत घरी राहून कंटाळा आला होता. आता शाळेत गेल्यानंतर सर्व मित्र मिळतात. मिळून दंगामस्ती करता येते, खेळता येते. त्यामुळे शाळेत जायला मज्जा येत आहे.-प्रशांत रायपुरे, विद्यार्थी

तिसरी लाट येण्याची शक्यता असून बालकांना त्याचा धोका असल्याचे इशारा आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवतांना भीती वाटते. परंतु, शाळा बंद राहिली तर शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे घाबरतच मुलाला शाळेत पाठवत आहे.-गोविंदा गेडाम, पालक

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा