शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या मागण्या शासनस्तरावर सोडविण्यासाठी पुढाकार घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 23:23 IST

भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. ही बाब न विसरता समाजाचे संघटन करून प्रत्येक समाजाने आपला विकास घडवून आणावा.

ठळक मुद्देहंसराज अहीर : भद्रावती येथे आदिवासी वीर-विरांगणा जयंती सोहळा

आॅनलाईन लोकमतभद्रावती : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. ही बाब न विसरता समाजाचे संघटन करून प्रत्येक समाजाने आपला विकास घडवून आणावा. आपण आपल्या सामाजिक समस्येकडे बोट दाखवा. हे सरकार तुमचे स्वप्न साकार करेल, असा विश्वास केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आपल्या भाषणातून दिला.येथील शिंदे मंगल कार्यालयात सोमवारी गोंडी धर्मीय आदिवासी एकता संघटना, भद्रावतीतर्फे संपूर्ण आदिवासी वीर-विरांगणा जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. सोहळ्याचे उद्घाटन माजी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ना. हंसराज अहीर तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे, नगरसेवक प्रमोद गेडाम, पंजाबराव मडावी, रमेश मेश्राम, रंजना उईके, विरेंद्र आत्राम, कांचन वरठी, मनोज आत्राम, भूपती मेश्राम, डॉ. मडावी, प्रमोद नागोसे, अजय लिहितकर, विशाल बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते.या सोहळ्याच्या निमित्ताने स्थानिक भद्रानाग मंदिरापासून पेट्रोलपंप चौकापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या रॅलीत जवळपास दहा हजार आदिवासी बांधव सहभागी झाले होते. सदर रॅलीत विविध आदिवासी नृत्य करण्यात आले.रॅलीचे उद्घाटन नगराध्यक्ष अनिल धानोरकर व रमेश मेश्राम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मेळाव्यात आदिवासी समाजातील महापुरुषांना मानवंदना देण्यात आली. प्रास्ताविक अशोक तुमराम यांनी केले. संचालन प्रा. अविनाश यांनी तर आभार गितेश कुळमेथे यांनी मानले.