शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वरोरा तालुक्यात पट्टेदार वाघाचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:48 IST

मागील दोन दिवसांपासून वरोरा तालुक्यातील अनेक गावानजीक पट्टेदार वाघाने ग्रामस्थांना दर्शन दिले असून वरोरा शहरानजीकच्या खैरगावात गावा नजीकच्या गोठ्यात एक जनावर तर दोन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांना दर्शन : एक गोऱ्हा ठार, दोन गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील दोन दिवसांपासून वरोरा तालुक्यातील अनेक गावानजीक पट्टेदार वाघाने ग्रामस्थांना दर्शन दिले असून वरोरा शहरानजीकच्या खैरगावात गावा नजीकच्या गोठ्यात एक जनावर तर दोन गंभीर जखमी केल्याची घटना घडली असल्याने ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.वरोरा येथून नजीक चिमूर मार्गालगतच्या खैरगावमध्ये महादेव वाघ यांच्या शेतातील गोठ्यात जनावरे बांधून होती. या जनावरांवर पट्टेदार वाघाने हल्ला करून एक जनावर जागीच ठार तर दोन गंभीररित्या जखमी झाले. अमोल वाघ यांची जनावरे गंभीर जखमी होवून तडफत होती तर एक मरण पावले होते. परिसरात वाघ दिसल्याने आरडाओरड केली त्यानंतर ग्रामस्थ गोळा होताच वाघ नाल्याकडे निघून गेला. दोन दिवसापूर्वी याच वाघाने नजीकच्या जामगाव येथील जनावरे ठार केल्याची घटना घडली होती. ज्या ठिकाणी वाघाने हल्ला केला. पगमार्कवरुन हा पट्टेदार वाघ असल्याचा निष्कर्ष वनविभागाने काढला आहे.वाघाचे भद्रावती कनेक्शनवरोरा तालुक्यात वावरत असलेला वाघ हा काही दिवसांपूर्वी भद्रावती शहरानजीक वास्तव्यास होता. तोच वाघ वरोरा तालुक्यात फिरत असल्याचे मानले जात आहे.पाळीव जनावरे ठार झाली. तिथल्या पगमार्कवरून वाघ असल्याचे दिसून येते. परिसरात गस्त वाढविली असून वाघाला जंगलाच्या दिशेने पिटाळून लावणे सुरू आहे.- के.आर. आक्केवारवनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा