शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सिंदेवाही तालुक्यात दुग्ध व्यवसायाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:20 IST

शेतकºयांनी आपल्या शेतावर पिकणाºया मालावर आधारित उद्योग सुरु करणे काळाची गरज आहे.

ठळक मुद्देदूध प्रकल्प : शेतकरी व परिसरातील बेरोजगारांसाठी एक आदर्श

बाबुराव परसावार ।लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : शेतकºयांनी आपल्या शेतावर पिकणाºया मालावर आधारित उद्योग सुरु करणे काळाची गरज आहे. ही गरज लक्षात घेता सिंदेवाही येथील सुनील व अनिल उट्टलवार बंधूंनी सिंदेवाही येथे दूध डेअरी प्रकल्प सुरु करुन सिंदेवाही व तालुक्यातील शेतकºयांना दुग्ध व्यवसाय सुरु करण्याचा संदेश दिला आहे. यासोबतच बेरोजगारांसमोरही एक आदर्श ठेवला आहे.सिंदेवाही परिसरात दुधाची टंचाई लक्षात घेवून उट्टलवार बंधंूनी सिंदेवाहीत मदर डेअरी प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता त्यांनी मुर्रा जातीच्या १४ म्हशी व साहिवाल जातीच्या चार गायी विकत घेतल्या. या म्हशी व गायीपासून रोज १२० लिटर दुधाचे उत्पादन होते. उत्पादित झालेले दूध ते मदर डेअरीला देतात. दुधात गुणवत्ता असल्याने उत्पादित केलेल्या दुधाला ४० ते ५० रुपये लिटर भाव मिळत आहे. त्यांनी सिंदेवाही येथे मदर डेअरीचे संकलन केंद्र सुरु केले आहे. त्यामुळे शेतकºयांनी आणलेले दूध मदर डेअरी केंद्रात जमा केले जाते. दुध संकलन केंद्रावर शितकरण करण्याचे यंत्र आहे. म्हशीच्या देखभालीसाठी त्यांनी नियमित तीन मजूर ठेवले आहेत. प्रत्येकाला त्यांनी कामे वाटून दिली आहेत. दुध उत्पादक वैरणासाठी त्यांनी आपल्या शेतात डिएचएन- ६ यशवंत जयवंत गवत व मालदांडी ज्वारीची दोन एकरमध्ये लागवड केली आहे. ते तणसाचे वापर फार कमी प्रमाणात करतात. ते नेहमी कुटार आणि गव्हांडाचा वापर करतात. मजूर, गुराचे खाद्य आणि औषधी याचा खर्च वजा जाता महिन्याकाठी त्यांना साधारणत: ४० ते ५० हजार रुपयांचा फायदा होत आहे. उट्टलवार यांना आता पशुधनाचा अभ्यास झाला आहे. पशुधनावर सर्वसाधारण आजार उद्भवल्यास ते स्वत:च त्यांच्यावर उपचार करतात. मात्र गंभीर आजार दिसून आल्यास ते येथील पशु डॉक्टरकडे घेवून जातात. सिंदेवाही तालुक्यातील शेतकºयांना दुधाच्या विक्रीसाठी प्रत्येक दहा- पंधरा किलोमीटरवर मदर डेअरीच्या माध्यमातून राजोली, इटोली, वासेरा, वाकल, नवरगाव, पळसगाव, तळोधी आदी गावावरुन दुध सिंदेवाही येथे मदर डेअरी केंद्रावर आणले जात आहे. दररोज ७०० लिटर दूध संकलन केंद्रावर जमा होते. त्यामुळे दुधाला चांगले भाव मिळू लागले आहे. या योजनेअंतर्गत ३५० ते ४०० शेतकरी सहभागी झाले आहेत. सिंदेवाही तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांनी शेत मालावर आधारित उद्योग सुरु करुन तालुक्यातील युवकांनी पूरक उद्योग व्यवसाय केल्यास बेरोजगारीवर मात करता येईल. सिंदेवाही व तालुक्यातील पशुधन दिवसेंदिवस कमी होत असल्याने शासनाने शेतकºयांना गाय व म्हशीचे वाटप करुन प्रोत्साहन द्यावे, असे मत सुनील उट्टलवार यांनी व्यक्त केले.