शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

पोंभुर्णा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी

By admin | Updated: July 21, 2014 23:46 IST

पोंभुर्णा तालुका खनिज संपत्तीने नटलेला असून या तालुक्याला अंधारी आणि वैनगंगा नदी लाभलेली आहे. परंतु पोंभुर्णा तालुक्यात वाळू माफियांचे साम्राज्य चांगलेच पसरले असून प्रशासनाच्या

देवाडा खुर्द : पोंभुर्णा तालुका खनिज संपत्तीने नटलेला असून या तालुक्याला अंधारी आणि वैनगंगा नदी लाभलेली आहे. परंतु पोंभुर्णा तालुक्यात वाळू माफियांचे साम्राज्य चांगलेच पसरले असून प्रशासनाच्या डोळ्यात धूळ झोकून वाळूची अवैधरीत्या तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याकडे महसूल प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष व पोलीस प्रशासनाच्या आशिर्वादाने दररोज शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला असूनही तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. दोन-तीनदा पाऊस आला. तोही रिमझीम स्वरुपाचाच होता. त्यामुळे यावर्षी वाळू माफियांचे चांगलेच फावत आहे. मागील पंधरवड्यात तर नदीचे पात्र कोरडेच होते. त्याचवेळी वाळूमाफियांकडून नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा करून वाळू इतरत्र उचलून ठेवण्यात आलेली आहे. मोहाबा गावाच्या रस्त्याने, वेळवा नवेगाव मोरे या रोड लगत अशा अनेक ठिकाणी मोठमोठे वाळूचे ढिगारे ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे.पोंभुर्ण्यातही काही ठिकाणी बांधकामाचे नावे सांगून वाळूचीे साठेबाजी केली जात आहे. मात्र याकडे महसूल विभाग व पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे जनतेकडून बोलले जात आहे. आजच्याही स्थितीत दिवस-रात्रभर रेतीची ट्रकच्याद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जात आहे. पोंभुर्णा येथील आंबेडकर चौकात तर पाच-दहा ट्रक उभे असलेले पाहायला मिळतात. रेतीच्या ओव्हरलोडमुळे वेळवा-पोंभुर्णा, पोंभुर्णा-चिंतलधाबा-आक्सापूर या मार्गाची दुरवस्था झालेली आहे. पोंभुर्णा-वेळवा रोडवरही मोठमोठे खड्डे पडलेले आहे. या परिसरातील जनतेला याचा परिणाम भोगावा लागत आहे. मात्र याकडे या क्षेत्राच्या लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत आहे.तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी रस्ते बनविले जातात. परंतु अशा ओव्हरलोड वाहतुकीमुळे या रस्त्याची ऐशीतैशी होत असल्याने तालुक्यातील जनतेला याचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.या तालुक्यातील रेती बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर व आंध्रातही जात असल्याची चर्चा सुरू आहे. रेतीचा दर्जा चांगला आहे. त्यामुळे वाळुची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाळू माफियांकडून संबंधित विभागाचे हात ओले करून म्हणजेच चिरीमिरी देवून मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जात आहे.पोलीस कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर दिवसरात्र खुलेआमपणे वाळूची वाहतूक होत असूनही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे जनतेकडून बोलले जात आहे. (वार्ताहर)