शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

वादळामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान

By admin | Updated: May 30, 2017 00:32 IST

शनिवारी जिल्ह्यात काही भागात वादळाने थैमान घातल्यानंतर रविवारीसुद्धा सायंकाळच्या सुमारास वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

वीज पुरवठा खंडित : अनेक घरांचे छत उडाले, झाडेही उन्मळून पडली.लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शनिवारी जिल्ह्यात काही भागात वादळाने थैमान घातल्यानंतर रविवारीसुद्धा सायंकाळच्या सुमारास वादळ वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे चंद्रपूरसह जिल्ह्याभरात अनेक ठिकाणची झाडे कोसळली, विद्युत खांब कोसळले, अनेकांच्या घरावरील छत उडाले. त्यामुळे रविवारच्या वादळाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सगळीकडे नवतपाचे चटके बसत असताना जिल्ह्यात शनिवार व रविवारी सायंकाळपासून वादळाने थैमान घातले. चंद्रपुरात रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक वादळ सुटले. जवळपास १५ मिनिटे केवळ वादळ घोंगावत राहिले. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. या वादळामुळे व्यावसायिकांचे बॅनर, बोर्ड उडून गेले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली तर वीज ताराही तुटल्या. परिणामी वीज पुरवठा खंडित झाला. हॉस्पीटल वॉर्डातील काही भागात रात्रभर वीज गूल होती. त्यामुळे चिमूर तालुक्यातील भिसी येथील अनेकांच्या घरांची छते उडाली. तर शनिवारला भिसी येथील बाजार असल्याने अनेक व्यापारी व किरकोळ व्यावसायिकांचे नुकसान झाले. रविवारच्या वादळी पावसाने मूल-गडचिरोली मार्गावरील विजेचे खांब पूर्णपणे वाकले. त्यामुळे मूलमध्ये वीजपुरवठा बराच वेळ खंडीत झाला होता. कोरपना तालुक्यातही रविवारला मोठ्या प्रमाणात वादळ वाऱ्यासह पाऊस आला. त्यामुळे कोरपना, कन्हाळगाव, पारडी, गेवरा आदी ठिकाणच्या घराचे छत उडून गेले. तर सावली तालुक्यातील निफ्रंदा येथील मारोतराव भांडे, मिराबाई भांडे यांच्या घरावर चिंचेचे झाड पडल्याने त्याचे घर जमीनदोस्त झाले. तर अंबादास लाडवे यांच्या बैलावर टिनाचे पत्रे पडल्याने बैल जखमी झाला. तर ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव परिसरातील अनेकांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाले.