स्थानिक इंदिरा नगर वार्ड न. ४ येथील रहिवासी असलेले भाऊराव झाडे यांना शासनाकडून वास्तव्यासाठी जमीन देण्यात आली होती; मात्र अमोलची सावत्र आई कमलाबाई झाडे हिने पतीच्या निधनानंतर दुसरे लग्न करून स. न. ९९/२ पैकी प्लाॅट क्र. ५३ क्षेत्र १०० चौ. मीटर शंकर रामटेके यांना परस्पर विकली. यासंदर्भात तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस स्टेशन गोंडपिपरी यांना तक्रारी देऊनही अजूनपर्यंत कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही. माझ्या वडिलांच्या निधनानंतर कमलाबाई हिने दुसरा विवाह केला. त्यामुळे सदर जमिनीचा ताबा मला हवा होता; मात्र तिने मला कसल्याही प्रकारची माहिती न देता परस्पर विकली. ही जमीन शासनाच्या नियमानुसार विक्री, देवाण-घेवाण, गहाण, अभिहस्तांकन किंवा इतर कोणत्याही पद्धतीने हस्तांतरीत करता येत नसतानाही शासनाची दिशाभुल करून तिने प्लाॅट विक्री केली आहे. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असून, कमलाबाईवर कारवाई करून विक्री केलेला प्लाॅट मला परत मिळवून द्यावा, अशी मागणी अमोल झाडे यांनी केली आहे.
शासनाकडून मिळालेली जमीन सावत्र आईने परस्पर विकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST