शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

जमीन हडपणाऱ्या रॉकेटचा पर्दाफाश

By admin | Updated: March 26, 2015 00:48 IST

गरजू शेतकऱ्यांना शोधून त्यांना काही रक्कम द्यायची, त्यानंतर ती रक्कम शेतकरी परत करू शकत नसल्याने ..

वरोरा : गरजू शेतकऱ्यांना शोधून त्यांना काही रक्कम द्यायची, त्यानंतर ती रक्कम शेतकरी परत करू शकत नसल्याने सातबारावर कर्जाचा बोजा असतानाही अत्यल्प भावात जमिनीची विक्री करणाऱ्या रॉकेट वरोरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सहा शेतकऱ्यांची ११.८४ हेक्टर आर जागा हडपणाऱ्या १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी वरोरा पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे जमीन हडप करणाऱ्या माफीयांत चांगलीच खळबळ उडाली आहे. वरोरा तालुक्यातील दहेगाव येथील बळीराम विश्वनाथ महाकुळकर (७१) या शेतकऱ्याची निमसडा येथील शेत सर्वे क्र ३० भो.वर्ग मध्ये ३.२४ हेक्टर जमीन आहे. बळीराम यांना आर्थिक अडचण असल्याने त्यांनी रूपेश अशोक ढोके याच्याकडे दीड लाख रुपयात गहाण ठेवली. यामध्ये रूपेश ढोके सोबत सुभाष वाटकर, रविंद्र डोंगरे यांनी संगमत करून इसारपत्र करून देण्याचा बहाना करीत खोटे कागदपत्र तयार केले व ३.२४ हेक्टर शेत जमीनीची रजिस्ट्री करून घेतली. तसेच तालुक्यातील दहेगाव येथील जिजाबाई बालाजी वांढरे ही महिला आपली १.५० हेक्टर शेतजमीन ७० हजार रूपयात गहाण ठेवण्यासाठी गेली असता, तात्पुरता इसारपत्र करावा लागते, असे सांगत पृथ्वीराज धर्मा भगत, सुभाष बिजाराम वाटकर व अशोक मोतीराम चिमनकर यांनी संगनमत करून जिजाबाई वांढरे यांच्या अज्ञानाचा फायदा घेत विक्री करून घेतली. चिकणी येथील नानाजी खेजाजी टोंगे यांची तीन हेक्टर शेत जमीन दीड लाख रुपये देवून गहाण ठेवण्यासाठी गेले. तेव्हा विक्री पत्रावर पाच लाख रुपये दर्शवून इसार पावती करून घेतो असे म्हणून नानाजी टोंगे यांना काहीही वाचून न दाखविता जगदीश दौलत कामडी, दादा करड, रविंद्र डोंगरे, जयदेव बोढाले यांनी संगनमत करून जमिनीची विक्री करून घेतली. दहेगाव येथील नारायण ठमके यांची २.३३ हेक्टर जमीन कल्पना नंदकिशोर निब्रड, दादा करडक, सुभाष वाटकर, रविंद्र डोंगरे यांनी संगनमत करून ५० हजार मोबादला देवून विक्री पत्रावर चार लाख रुपये किंमत दर्शविली. या प्रकरणातही ठमके यांना कोणतेही कागदपत्रे वाचून दाखविले नाही व रजिस्ट्रार कार्यालयातून शेतीची सरळ विक्री करून घेतली. शेगाव येथील गौरव नानाजी लुन्ने यांची १.४८ हेक्टर जमीन एक लाख रुपयाचा मोबदला देत विक्रीपत्रावर चार लाख रुपये किंमत दर्शवून अशोक नानाजी पारधी, रविंद्र डोंगरे व जयदेव बोढाले यांनी विक्री करून घेतली. मेसा येथील यशवंत दयाराम वरभे यांची ३.२९ हेक्टर जमीन त्यांच्या वडीलास भुलथाप देऊन कोणताही मोबदला दिला नाही. विक्री पत्रावर तीन लाख ९५ हजार रुपये दर्शवून अन्नु विनोद खोब्रागडे, अन्नपूर्णा श्रावण पाटील, आनंद राघोबा आसुटकर, रविंद्र डोंगरे यांनी संगनमत करून जमिनीची विक्री करून घेतली. फसगत झालेल्या सर्व शेतकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी १३ जणांवर कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. (तालुका प्रतिनिधी)कर्जाचा बोझा तरी जमिनीची केली विक्रीसातबारावर कर्जाचा बोझा असतानासुद्धा जमिनीची विक्री करण्यात आली. त्यामुळे कर्जाचा बोझा नसलेले सातबारा आले कसे हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे. असेच अनेक प्रकार वरोरा तालुक्यात घडले असून त्याची तक्रार नसल्याने प्रकरण समोर आले नाही. मात्र आता या रॉकेटचा पर्दाफाश झाल्याने या प्रकरणात आणखी मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.