नागभीड : भूमिधारी तत्त्वावर शासनाकडून मिळालेली शेतजमीन सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता खरेदी करण्यात आल्याची अनेक प्रकरणे नागभीड तालुक्यात उघडकीस आले आहेत. अशा जमिनी सरकार जमाही करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत २२ हेक्टर जमीन सरकार जमा झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.नवखळा येथील कुसुम हरिदास मेश्राम यांची भूमापन क्र. ५०६/१ मधील ४० आर नवखळा येथीलच मनोहर दयाराम मुरबांधे यांची भूमापन क्र. ५०६/२ मधील ६१ आर. कानपा येथील अंबादास प्रल्हाद मेश्राम यांची भूमापन क्र. २३ मधील १.४ हेक्टर, येनोली चक येथील शैलेंद्र दिवाकर पोशट्टीवार यांची भूमापन क्र. ९५/१ मधील १.७० हेक्टर, भूमापन क्र. २४५ मधील ६६ आर. येनोलीचक येथील प्रेमदास लक्ष्मण इचकापे यांची भूमापन क्र. २४६ मधील १.११ हेक्टर , येनोली चक येथील मनिषा शैलेंद्र पोशट्टीवार यांची भूमापण क्र. ९५/२ मधील १.७० हेक्टर, नांदेड येथील शंकर तुळशिराम बाळबुद्धे आणि मधुकर गोविंदा देवगिरकर यांची भूमापन क्र. ५९७ मधील ८१ आर., तेलडोंगरी सीताराम नामदेव बुरांडे, चंद्रकला गौतम राऊत, सुरेश शंकर राऊत, श्रीकृष्ण तानबा राऊत, रामदास मारोती दडमल यांची भूमापन क्र. २८/२ मधील १.४० हेक्टर आणि भूमापन क्र. २१ मधील ८७ आर. लखमापूर चक येथील कलावती अशोक जयस्वाल यांची भूमापन क्र. १९३ मधील ३४१ हेक्टर, आलेवाही येथील अब्दुल सादिक अ हसिब कुरेशी यांची भूमापन क्र. ड ९ मधील ६७ आर, लखमापूर चक येथील प्रतिभा भगवान जिभकाटे यांची भूमापन क्र. १४९/२ मधील एक हेक्टर, लखमापूर चक येथीलच उर्वशी सुरेश आगलावे यांची भूमापन क्र. ६० मधील २.३६ हेक्टर, लखमापूर चक येथीलच राहूल कवडू लांजेवार यांची भूमापण क्र. ६१/१ मधील १.९७ हेक्टर या जमिनीचा समावेश आहे.यात एकूण व्यक्तींची संख्या १५ असून त्यांची २१.६५ हेक्टर जमीन सरकार जमा करण्यात आली आहे. नागभीड तालुक्यात आणखी अनेक प्रकरणे असल्याची चर्चा आहे. या कारवाईने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
भूमिधारी तत्त्वावर वाटप करण्यात आलेली जमीन सरकारजमा
By admin | Updated: July 2, 2015 01:23 IST