लोकमत न्यूज नेटवर्कटेकामांडवा : जीवती तालुक्यात टेकामांडवा येथे बांधण्यात आलेल्या साठवण तलावाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे उघडकीस आले आहे. या निकृष्ट कामामुळे तलावातील सर्व पाणी पाझरले जावून तलाव आताच कोरडे पडत असल्याचे दिसून येत आहे. तलावातून सोडण्यात आलेल्या सांडव्यात मातीऐवजी मोठे दगड भरल्यामुळे पाणी वाहून जात आहे. त्यामुळे तलाव लवकरच कोरडे पडत आहे. परिणामी यावर अवलंबून असणारे शेतकरी तसेच मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाणी आटल्याने तलावातील मासे मृत्यूमुखी पडले आहे. संबंधित विभागाने पाहणी करुन उपाययोजना करावी, अशी मागणी आहे.
निकृष्ट बांधकामामुळे तलाव आटले
By admin | Updated: May 8, 2017 00:36 IST