नदीचे पाणी दूषित : प्रशासनाने जनजागृती करावीचंद्रपूर : पाणी हे जीवन आहे. असे संबोधले जाते. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक देवस्थानच्या परिसरात छोट्या मोठ्या नद्या व तलाव आहेत. त्या देवस्थानावर विविध दिनाचे औचित्य साधून जत्रा, यात्रा भरत असतात. त्यावेळी भाविकांकडून विविध प्रकारचे साहित्य हे नादीत मोठ्या प्रमाणात टाकले जाते.परिणामी नद्या दूषित होत आहेत. व नागरिकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वत:च नद्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी.चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या नदीकाठावरील देवस्थानात भाविकांची गर्दी असते. देवाची पूजा-अर्चा करायला आलेले भाविक महाप्रसाद म्हणून भोजनदान देतात. मात्र, त्याच ठिकाणी सतत वाहनत असणाऱ्या नदीपात्रात स्वयंपाकाचे उरलेले अन्न व कचरा टाकत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरलेली दिसत असून नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे.परिणामी सतत वाहणारे शुद्ध पाणी पिण्यायोग्य राहात नसून या अशुद्ध पाण्याचा पुरवठा पिण्याच्या टाकीतून इतर गावांना होतो. परिणामी, अनेकदा जनतेचे आरोग्य बिघडते. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड, चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी अनेक ठिकाणी महाशिवरात्री निमित्य जत्रा भरत असते. याठिकांणी अनेक प्रांतातून दूरवरुन या ठिकाणी भक्तगण येतात. माता-पित्याच्या अस्थीचे येथे विसर्जन केले जाते. नवस फेडले जातात. यावर्षी २४ फेब्रुवारीला यात्रा भरणार आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची अलोट गर्दी राहणार आहे. पण, स्वच्छता पाळल्या न गेल्यास दुर्गंधी, दूषित पाणी या ठिकाणी दिसून येणार आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे तेवढेच गरजेचे झाले आहे.तसेच स्वत:च भाविकांनी नद्यांच्या स्वच्छेची काळजी घ्यावी, नद्या प्रदूषणमुक्त होतील. तसेच प्रशासनाने नद्या प्रदुषणमुक्त करण्यासाठी विविध पातळीवर उपक्रम राबवावे. अशी मागणी जिल्ह्यातील सुज्ञ व्यक्तीकडून केल्या जात आहे. (नगर प्रतिनिधी)महाशिवरात्रीनिमित्य अनेक ठिकाणी यात्राचंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकांणी महाशिवरात्री निमित्य जत्रा भरत असते. यावेळी अनेक भागातील भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. याठिकांणी भाविकांची अलोट गर्दी असते. पण भाविकांकडून स्वच्छता पाळल्या जात नाही. त्यामुळे पाणी दूषित होते. व नागरिकांना आरोग्याच्या समस्या जाणवतात. त्यामुळे भाविकांनीच स्वत: नद्या प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.
भाविकांनो! नद्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्या
By admin | Updated: February 23, 2017 00:41 IST