शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पीक पंचनाम्यासाठी विमा कंपन्यांकडे मनुष्यबळाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

२०१८- १९ या खरीप हंगामातील पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतीम मुदत ३१ जुलै २०१८ तर बिगर कर्जदारी शेतकऱ्यांनी २४ जुलै २०१८ अशी जाहीर करण्यात आली आहे़ शासनाने अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील विविध पिके घेणारे (कुळाने अथवा भाडेकराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) या योजनेत सहभाग घेवू शकतात़ मागील वर्षाच्या खरीप हंगामात जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक करण्यात आली होती.

ठळक मुद्दे८९ हजार शेतकरी विमाधारक : ४८ हजार हेक्टर क्षेत्रात यंदा सोयाबीनची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात ३ लाख ४६ हजार क्षेत्र लागवडीखाली येऊ शकते. त्यान्पैकी ४८ हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन तर १ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रात भात लागवड करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामात ८९ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा भरला. परतीच्या पावसाने यावेळी प्रचंड नुकसान झाले. परंतु, विमा कंपनीकडे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्याचे वास्तव पुढे आले आहे.शेती प्रामुख्याने पावसावर आधारीत असून ८५ टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. अतिवृष्टी अथवा पावसातील खंड आणि किड रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पन्नात मोठी घट होते़ लागवडीचा खर्चदेखील निघत नाही़ त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी शासनाकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे़२०१८- १९ या खरीप हंगामातील पीक विमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी अंतीम मुदत ३१ जुलै २०१८ तर बिगर कर्जदारी शेतकऱ्यांनी २४ जुलै २०१८ अशी जाहीर करण्यात आली आहे़ शासनाने अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील विविध पिके घेणारे (कुळाने अथवा भाडेकराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) या योजनेत सहभाग घेवू शकतात़ मागील वर्षाच्या खरीप हंगामात जिल्ह्याकरिता भारतीय कृषी विमा कंपनीची नेमणूक करण्यात आली होती. शेतकऱ्यांची विम्यापोटी ४९ कोटी ७१ लाख४४ हजार ६१ रूपयांची रक्कम प्रिमियम म्हणून सदर कंपनीला भरली होती. त्यापैकी २४ हजार ७१८ शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार आहे.उर्वरित १६ हजार ४४२ शेतकºयांचे उंबरठा उत्पन्न पीक विम्याच्या निकषात न बसल्याने लाभ मिळू शकला नाही. यंदाच्या खरीप हंगामासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील खरीप हंगामात विमा काढण्यासाठी कापूस उत्पादक शेतकºयांनीच कानाडोळा केला होता़ यंदा असे कदापि घडणार नाही, असा दावा सुत्रांनी केला आहे़विम्यासाठी आवश्यक कागदपत्रेखरीप हंगाम २०१८ पासून सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव बँकेला सादर करताना बिगर कर्जदार शेतकºयांनी छायाचित्र असलेले बँक खाते पुस्तकाची प्रत, आधारकार्ड छायांकित प्रत सादर करावा. आधारकार्ड उपलब्ध नसल्यास संबंधित कार्डची नोंदणी पावतीसोबत खालीलपैकी कोणताही एक फोटो असलेला पुरावा मान्य केला जाईल. मतदान ओळखपत्र, किसान क्रेडीटकार्ड, नरेगा जॉबकार्ड किंवा वाहनधारक परवाना सादर करता येवू शकते़ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी बँकेच्या कर्जखात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा.विमा संरक्षणाची अटपीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधित उत्पादनात येणारी घट, पीक पेरणी व लावणीपूर्व तसेच हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत नुकसान भरपाई निश्चित करणे व काढणी पश्चात नुकसान झाल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळतो. मागील हंगामात ४१ हजार १६० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यातील २४ हजार ७१८ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. शासनाच्या निकषात बसल्यामुळेच हे शेतकरी विमा लाभासाठी पात्र ठरले.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जCrop Insuranceपीक विमा