ब्रह्मपुरी शहराची व्याप्ती चारही बाजूने मोठ्या प्रमाणात झाली आहे. सध्या कोरोनाचे सावट असल्याने स्वच्छतेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मुख्य रस्ते दररोज स्वच्छ केले जातात. मात्र अंतर्गत रस्ते आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ होणे आवश्यक आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कचरा संकलनाच्या गाड्या दुर्मीळ झाल्या आहेत. त्यांच्या फेऱ्या कमी झाल्याने गोळा करण्यात आलेला कचरा देण्यासाठी गाड्यांची वाट पाहावी लागत आहे. या गाड्या पूर्वीप्रमाणे दररोज नित्यनियमाने येणे आवश्यक असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
कोट
सफाई मजूर भरतीबाबत लवकरात लवकर निविदा काढल्या जाणार आहे. यानंतर लवकरच स्वच्छता कार्याला गती येईल. कचरा संकलन गाड्याची अनियमितता असेल तर स्वतः लक्ष घालून नियमितता आणेल.
- रिता दीपक उराडे,
नगराध्यक्ष, ब्रह्मपुरी.