शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

आयसीयू विभागातच दक्षतेचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 00:50 IST

चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात आले. त्यामुळे आता जिल्हावासीयांना चांगली आरोग्यसेवा मिळेल, अशी अपेक्षा होती.

ठळक मुद्देमनुष्यबळाची वानवा : पायाभूत सुविधाच नाही अन् यंत्र हाताळणारे प्रशिक्षितही नाही

रवी जवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्यात आले. त्यामुळे आता जिल्हावासीयांना चांगली आरोग्यसेवा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र आरोग्य सेवेशी निगडित यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची कमतरता या दोन गोष्टींचा जिल्हा सामान्य रुग्णालयात अभाव असल्यामुळे त्याचा आरोग्यसेवेवर परिणाम होत आहे. येथे अतिदक्षता विभाग असला तरी या विभागासाठी असणाºया पायभूत सुविधाच या ठिकाणी नसल्याची माहिती समोर आली आहे.अतिदक्षता विभागात येणारा प्रत्येक रुग्ण अत्यंत गंभीर असतो. त्याच्यावर या ठिकाणी अतिशय गांभीर्याने उपचार करावा लागतो. त्यासाठी अत्याधुनिक यंत्र आणि ते हाताळणाºया प्रशिक्षित मनुष्यबळ असावा लागतो. मात्र चंद्रपुरातील अतिदक्षता विभागात या दोन्ही गोष्टीची वानवा आहे. अतिदक्षता विभागात मुबलक आॅक्सीजन सिलिंडर हवे, बॉयोपॅप, सीपॅप, व्हेंटीलेटर हवे, डोप्यामीन, नॉर अ‍ॅड्रानॅलीन आणि ते देण्यासाठी मायक्रोड्रीप युनीट हवे. मात्र येथील सामान्य रुग्णालयात यातील अनेक गोष्टी नाही. व्हेंटीलेटर अलिकडेच खरेदी केले आहे, मात्र ते हाताळणारा प्रशिक्षित मनुष्यबळ नाही.रुग्णालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार जिल्हाभरातून वा गडचिरोली जिल्ह्यातून दररोज सुमारे साडेतीनशे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले जातात. सहाजिकच ते गंभीर रुग्ण असतात. मात्र येथील आयसीयूमध्ये केवळ सहाच रुग्णांना ठेवता येते. तेवढीच उपलब्धता येथे आहे. मात्र दररोज येथे येणाºया १५ ते २० रुग्णांना आयसीयूची गरज भासते. येथील कार्यरत तज्ज्ञ डॉक्टरांना इच्छा व रुग्णाची गरज असूनही सर्व रुग्णांना आयसीयूमध्ये ट्रीटमेंट देता येत नाही. यामुळे स्वाभाविकच रुग्णांची हेळसांड होते. या भानगडीत काही रुग्ण दगावतात देखील.मेडीकल कॉलेज झाले; मात्र रुग्णालय तसेचचंद्रपूरला शासकीय मेडीकल कॉलेज आले. याला आता तीन वर्षांचा कालावधी होत आहे. मेडीकल कॉलेज अस्तित्वात असताना प्रत्येक गंभीर रुग्णावर चंद्रपुरातच उपचार होणे अपेक्षित होते. मात्र अजूनही चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातून वा एखाद्या खासगी इस्पीतळातून ‘रेफर टू नागपूर’ चा प्रकार सुरूच आहे. मेडीकल कॉलेज आहे, जिल्हा रुग्णालय आहे, शहरात अनेक ठिकाणी जागाही उपलब्ध आहे. तरीही रुग्णालयाची स्थिती आणि तेथील सुविधा अत्याधुनिक झालेल्या नाही. कधी आजाराशी निगडित यंत्र उपलब्ध नसते. यंत्र असेल तर ते देखभालीअभावी नादुरुस्त असते तर कधी यंत्र हाताळणारे प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी नसतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे येथील अतिदक्षता विभागात रुग्णांसाठी जागाही नसते. या सर्व प्रकारामुळे डॉक्टरांना नाईलाजाने रुग्णांना ‘रेफर टू नागपूर’ करावे लागते.डॉक्टरांचाही नाईलाजजिल्हा सामान्य रुग्णालयात रुजू होऊन रुग्णांना मनोभावे सेवा देऊ इच्छीणारे अनेक डॉक्टरही येथे कार्यरत आहेत. अनेकवेळा हे डॉक्टर राऊंडवर असताना रुग्णांना भेटतात. त्यावेळी जमिनीवर चादर टाकून उपचार घेत असलेला रुग्ण बघून त्यांच्याही डोळ्यात अश्रूू तरळते. परंतु डॉक्टर असल्याने संवेदनशिलता बाजूला सारून त्यांना आहे त्या स्थितीत उपचार करावा लागतो. हा सर्व प्रकार सुविधांच्या अभावामुळेच होत आहे.