शहरं
Join us  
Trending Stories
1
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
2
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
4
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
5
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
6
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
7
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
8
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
9
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
10
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
11
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
12
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
13
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
14
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
15
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
16
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
17
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
18
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
19
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
20
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले

डाटा एंट्री आॅपरेटर्सच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड

By admin | Updated: August 28, 2015 01:20 IST

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात डाटा एंट्री आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या राज्यातील कंत्राटी डाटा एंट्री आॅपरेटर्सच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे.

चंद्रपूृर : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात डाटा एंट्री आॅपरेटर म्हणून काम करणाऱ्या राज्यातील कंत्राटी डाटा एंट्री आॅपरेटर्सच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड कोसळली आहे. सहसंचालकांच्या आदेशामुळे राज्यातील ७५ पैकी ४६ कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीला मुकण्याची पाळी येणार आहे. यात चंद्रपूर जिल्यातील सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एप्रिल-२०१५ मध्ये या कर्मचाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आली होती. ११ महिन्यांनंतर म्हणजे मार्च-२०१६ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपणार होत. मात्र अचानकपणे २५ सप्टेंबरला आरोग्य सहसंचालकांच्या कार्यालयातून आदेश आला. त्यात, सप्टेंबर-२०१५ पासून या कर्मचाऱ्यांची सेवा खंडीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्यावरील अन्यायासंदर्भात माहिती देण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या प्रतिनिधींनी बुधवारी एक पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील अन्याय मांडला. यासंदर्भात बोलताना निलेश सुभेदार म्हणाले, केवळ अल्प मानधनावर मागील अनेक वर्षांपासून राज्यातील डाटा एंट्री आॅपरेटर सेवा देत आहेत. रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि पक्षघात (लकवा) या आजारांसाठी हे कर्मचारी काम करतात. विशेषत: ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेसाठी या कर्मचाऱ्यांनी मोलाची मदत सुरू आहे.चंद्रपूर जिल्ह्यात २०१२ पासून राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम सुरू असून त्यात हे कर्मचारी सेवा देत आहेत. कंत्राटी आरोग्य कर्मचारी जीवाचे रान करून सेवा देत असले तरी सरकारकडून अन्याय सुरु आहे. अनेक लोकोपयोगी योजना गुंडाळण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. सुसुत्रीकरण योजना राबविली जात असताना टप्पा क्रमांक एक मध्ये ही प्रक्रिया कोणत्या प्रकारे पूर्ण करण्यात आली याची माहिती देण्यात आलेली नाही. कर्माऱ्यांवर अतिरिक्त भार देण्यात आला असून कामाचा व्यापही वाढविला आहे. नवीन होणाऱ्या पदभरतीमध्ये या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आपल्यावरील अन्यायाला दाद मागण्यासाठी वित्तमंत्र्यांची भेट घेणार असून या विरोधात आंदोलन उभारले जाईल, आणि न्यायालयात दाद मागितली जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला रामेश्वर बारसागडे, कुंदन देवईकर, देवेंद्र पिंपळकवर, श्वेता कंचर्लावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)