शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मपुरी शहरातील क्रिष्णा-कॉलनीत सुविधांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:27 IST

ब्रह्मपुरी : शहरातील क्रिष्णा कॉलनी परिसरात मागील अनेक वर्षांपासून विकास कामे करण्यात आली नसल्याचा, आरोप या भागातील नागरिकांनी केला ...

ब्रह्मपुरी : शहरातील क्रिष्णा कॉलनी परिसरात मागील अनेक वर्षांपासून विकास कामे करण्यात आली नसल्याचा, आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. नगरपरिषदेच्या उदासीन धोरणामुळे येथील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

या समस्या सोडविण्यासाठी नगरपरिषदेने जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरात राहणारे नागरिक करीत आहेत. जोपर्यंत येथील प्रमुख समस्या नगरपरिषद सोडविणार नाही, तोपर्यंत आम्ही टॅक्स भरणार नाही, अशी कठोर भूमिका घेतली असून, टॅक्स वसुलीसाठी आलेल्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना खडेबोल सुनावत माघारी पाठविण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

सदर वसाहत बसून जवळपास १० ते १२ वर्षे पूर्ण झाली. परंतु आजतागायत या परिसरात पक्के रस्ते, नाल्या, नळयोजना अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. प्रत्येक वेळी सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिल्या जाते. परंतु निवडणुकीनंतर निवडून आलेल्या नगरसेवकांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो. त्यामुळे हा परिसर पूर्णपणे मागासलेल्या अवस्थेत आहे.

या परिसरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी मोठमोठ्या गटारी तुंबलेल्या असून घरा-घरातील तसेच गटारीचे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सदर परिसरातील नागरिकांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे. परंतु येथे कोणत्याही नागरी सुविधा पुरविण्यात येत नाही. मागील १२ वर्षांपासून हा परिसर विकास कामापासून पूर्णपणे दुर्लक्षित आहे. दरवेळेस या भागाकडे मुद्दामहून दुर्लक्ष केल्या जाते. या संदर्भात येथील नागरिकांनी नगर परिषदेला अनेक वेळा निवेदने दिलेली आहेत. मात्र आजतागायत कोणीही येथील समस्यांची दखल घेतली नाही. नगर परिषदेने तात्काळ या भागाकडे जातीने लक्ष देऊन रस्त्यांची,नाल्यांची,पिण्याच्या पाण्याची,सांडपाणी प्रक्रिया वाहून नेण्याची समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात येत आहे.

बॉक्स

६५ लाखांचे अंदाजपत्रक तयार

सध्याच्या परिस्थितीत वाढीव पाणीपुरवठा योजने अंतर्गत शहरात मोठ्या प्रमाणावर नळ योजनेचे पाईपलाईन टाकणे सुरू आहे. क्रीष्णा कॉलनीतसुद्धा पाईपलाईन टाकणे सुरु असल्याने सध्याच्या परिस्थितीत सर्व कामे ठप्प ठेवण्यात आली आहेत. क्रीष्णा कॉलनीत ६५ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून येत्या सहा महिन्यात येथील रस्ते, नाल्या आणि नळयोजना पुर्ण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर खुल्या भूखंडावर ग्रीन जीम बनविण्यात येणार आहे,अशी माहिती गटनेते तथा बांधकाम सभापती विलास विखार यांनी दिली.