शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरण पथक पोहोचले महाविद्यालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 05:00 IST

शहरातील महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन १८ वर्षांवरील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड १९ लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत शहरातील विविध महाविद्यालयांत  मिशन युवा स्वास्थ्य  मोहिमेतंर्गत लसीकरण शिबिर होणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मनपातर्फे शहरात लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्थायी लसीकरण केंद्रांसोबतच ‘लसीकरण आपल्या दारी’ मोहिमेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. याच मालिकेत मंगळवारपासून सोमय्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी ‘युवा स्वास्थ्य कोविड लसीकरण’ मोहिमेचा प्रारंभ उपमहापौर राहुल पावडे यांच्याहस्ते करण्यात आला.यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी भारत, डॉ. अतुल चटकी, डॉ. अश्विनी येडे व सोमय्या पॉलिटेक्निकचे मुख्याध्यापक प्रा. मोहम्मद जमीर शेख आदी उपस्थित होते.शहरातील महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन १८ वर्षांवरील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविड १९ लसीकरण प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत शहरातील विविध महाविद्यालयांत  मिशन युवा स्वास्थ्य  मोहिमेतंर्गत लसीकरण शिबिर होणार आहेत. मनपा आयुक्त राजेश मोहिते यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधून महारथी कर्णाच्या अभेद्य कवचकुंडलांचा दाखला विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले. उपमहापौर पावडे लसीकरण कामगिरीची माहिती दिली. यावेळी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. गर्गेलवार, डॉ. भारत, डॉ. चटकी व डॉ. येडे यांनी विचार मांडले.  

सोमय्यात आजही होणार लसीकरणमिशन युवा स्वास्थअंतर्गत १८  वर्षांपुढील  विद्यार्थ्यांना सोमय्या पॉलिटेक्निकमध्ये २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी  १०. ३० ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत कोविड लस देण्यात येणार आहे. स्वत:सोबत कुटुंबाचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी हा उपक्रम मोलाचा असल्याने पात्र विद्यार्थ्यांनी कोविड प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन संस्थापक पी. एस. आंबटकर, उपाध्यक्ष पियुष  आंबटकर, अंकिता आंबटकर आदींनी केले. उपक्रमासाठी रजिस्ट्रार बिसेन, प्रा. नागराळे, प्रा. पोहनकर, प्रा. आंबटकर, प्रा. बाबारे,  प्रा. धनश्री कोटकर,  प्रा. सोंडवले व शिक्षक  व  शिक्षेकतर कर्मचारी  सहकार्य करीत आहेत.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसStudentविद्यार्थी