शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

कोठारीतील फुले-आंबेडकर सांस्कृतिक भवनाची दुर्दशा !

By admin | Updated: August 28, 2015 01:22 IST

बल्लारपूर तालुक्यातील कोठारी दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव. गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या आसपास. गावातील सामाजिक एकोपा एकसंघ आहे.

सुरेश रंगारी कोठारीबल्लारपूर तालुक्यातील कोठारी दुसऱ्या क्रमांकाचे मोठे गाव. गावाची लोकसंख्या १५ हजारांच्या आसपास. गावातील सामाजिक एकोपा एकसंघ आहे. गावातील नागरिकांना मध्यवर्ती ठिकाणी विचारांचे आदानप्रदान करण्यासाठी सामाजिक भवनाची गरज माजी खासदार नरेश पुगलिया यांनी हेरली. त्यांनी खासदार फंडाचा आठ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून फुले-आंबेडकर सांस्कृतिक सभागृहाची निर्मीती करून सन २०१४ ला ग्रामस्थांसाठी खुले केले. त्याची देखभाल करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे सोपविली. मात्र गेल्या दहा वर्षात या भवनाची दयनीय अवस्था झाली आहे. फुले-आंबेडकरांच्या नावाने असलेले सांस्कृतिक भवन ग्रामपंचायतीच्या नाकर्तेपणाने मद्यपी व मोकाट जनावरांचे आश्रयस्थान बनल्याचे विदारक चित्र आहे.आठ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेले भवन कोणी आपला वाली आहे काय, असाच जणू प्रश्न विचारीत उभे आहे. भवनाच्या आवारात सर्वत्र कचरा साचलेला आहे. मोकाट जनावरांचा यात सदैव वावर असतो. आतील भागात भयावह स्थिती आहे. भवनात लावलेले सर्व पंखे चोरट्यांनी लंपास केले आहे. इलेक्ट्रीक वायरिंग अत्यावस्थ असून कोणी हात लावण्याचा प्रयत्न केल्यास जिविताला धोका निर्माण होतो. शौचालयाची दयनीय स्थिती असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. भवनात सर्वत्र विदारक परिस्थिती असून त्यात कोणी सभा, कार्यक्रम करण्याचे धाडस करीत नाही. भवनाचा आतील व बाहेरील रंगरंगोटी केलेली नसल्याने भवनाकडे कुणी पाहण्याची हिंमत करीत नाही. भवनाच्या खिडकीच्या काचा पुर्णता फुटलेल्या आहेत. फ्लोरिंगची अवस्था न पाहण्यासारखी झाली आहे. भवनाच्या अवती भवती कचऱ्याचे ढिगारे व रस्त्यावर मोठ्या वाहनांची रात्रंदिवस अतिक्रमण असते. परिणामी भवनात प्रवेश कुठून करावा असा प्रश्न निर्माण होतो.गावातील विविध समारंभ, सभा, बैठका व छोटेखानी कार्यक्रम करण्यासाठी भवनाचा चांगला उपयोग होवू शकतो. गोरगरिबांच्या लग्न कार्यासाठीही भवन उपयोगात येवू शकते. मात्र त्याच्या देखभालीकडे, व्यवस्थेकडे व स्वच्छतेकडे पुर्णत: दुर्लक्ष झाल्याने त्यात कोणतेही कार्यक्रम होणे कठीण आहे. भवनाची रंगरंगोटी, इलेक्ट्रीकची योग्य व्यवस्था, स्वच्छता करून जनतेच्या कल्याणासाठी भवन उपयोगात आणल्या जावे अशी मागणी आहे.