शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

पोंभुर्णा तालुका विकासापासून कोसोदूर

By admin | Updated: July 21, 2014 00:07 IST

पोंभूर्णा तालुका आदिवासी व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तालुका होऊन १५ वर्षे झाले. मात्र अजूनही विकास झालेला दिसून येत नाही.

देवाडा खुुर्द : पोंभूर्णा तालुका आदिवासी व नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. तालुका होऊन १५ वर्षे झाले. मात्र अजूनही विकास झालेला दिसून येत नाही.तालुक्यामध्ये ७१ गावे आहेत. एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे आणि ३२ ग्रामपंचायत व गट ग्रामपंचायत आहे. आरोग्य व रस्त्याच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाही. तालुक्याचा विचार केल्यास गंगापूर, टोक, कुराना, घोसरी, देवाडा, जुमगाव लोक बल्लारपूर, देवई चेक आबेधानोरा, सोनापूर चेक आष्टा व अनेक खेड्यांना जोडण्यासाठी योग्य रस्ताच नाही. त्यामुळे त्या गावच्या नागरिकांना तालुक्याशी संपर्क करताना तारेवरची कसरत करावी लागते. अनेक गावातील विद्यार्थ्यांना पायी येऊन पोंभूर्णा येथे शिक्षण घ्यावे लागत आहे. अशावेळी रस्त्याची दुरवस्था झाली असल्याने वाहन गावापर्यंत पोहचत नाही. सायकल दुचाकी वाहन किंवा बैलबंडीचा आधार घ्यावा लागतो. रुग्णांंचीही मोठी हेळसांड होते. मात्र ज्यांची परिस्थिती हालाखीची आहे ते उपचारापासून वंचित राहतात. त्यामुळे उपचार करण्यापेक्षा जडीबुटी बरी असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येते. गेल्या एक ते दोन वर्षापासून ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी असूनसुद्धा अजूनही कामे सुरू झालेली नाही. त्याचप्रमाणे न्यायालयाचे कामकाज भाड्याच्या घरामध्ये सुरू आहे. १५ वर्ष लोटूनही पोंभूर्णा तालुका विकासापासून दूरच राहिला आहे. पं.स. इमारतीचे बांधकाम धिम्या गतीने सुरू आहे. काही कार्यालय भाड्याच्या घरात आहेत. त्यामुळे तालुक्यातील तहसिल कार्यालय, पंचायत समिती व इतर कार्यालयात अजूनही लोकांची कामे वेळेवर होत नाही. या भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला हवा. मात्र लोकप्रतिनिधी गप्प राहण्यातच धन्यता मानतात. यामुळे पोंभूर्णा तालुक्याचा वाली कोण? हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. नेहमी अनेक राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी निवडणुका जवळ येताच विकासाच्या मुद्यावर बोलताना दिसतात. मात्र त्यांचे हे बोलणे केवळ मते मिळविण्यासाठीच असल्याचे दिसून येते.(वार्ताहर)