शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोंडवाड्यातील जनावरांना ना चारा, ना पाणी !

By admin | Updated: July 1, 2016 01:08 IST

जनावरांची तस्करी करीत असताना कोठारी पोलिसांनी कारवाई करुन पकडले. कायदेशीर कारवाई करुन १७ जनावरांना कोठारी ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात टाकण्यात आले.

ही कसली शिक्षा ?: ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्षकोठारी : जनावरांची तस्करी करीत असताना कोठारी पोलिसांनी कारवाई करुन पकडले. कायदेशीर कारवाई करुन १७ जनावरांना कोठारी ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात टाकण्यात आले. मात्र सदर जनावरांच्या चारा पाण्याची तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी करण्यात ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार दिसून आला.१४ बैल व तीन म्हशींना अवैधरित्या खरेदी करुन तस्करी करीत असल्याचा सुगावा ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांना लागला. त्यांनी सापळा रचून तस्करांच्या तावडीतून जनावरांना मुक्त केले. तस्करांवर गुन्हे दाखल करुन अटक केली. जप्त करण्यात आलेल्या १७ जनावरांना २५ जूनला कोठारी येथील ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात टाकले. ठाणेदारांनी दोन दिवस जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था केली. मात्र त्यानंतर ग्रामपंचायतीने जनावरांना चारा रोज देणे बंद केले. ग्रामपंचायतीकडे चारा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र चाऱ्याची व्यवस्था करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. कोंडवाड्यातील जनावरांची योग्य निगा व त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी असताना व त्याचा मोबदला मिळत असताना त्याकडे दुर्लक्ष का करण्यात येत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चारा संपला असेल तर त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. जनावरे कोंडवाड्यात टाकल्यापासून त्याची जबाबदारी १७ दिवस ग्राम पंचायतीची असते. त्यानंतर त्यांचे मालक न आल्यास लिलावाद्वारे जनावरे विकण्यात येतात. मात्र बंदिस्त जनावरांच्या चारा, पाणी व आरोग्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने उचलली पाहिजे. सध्या पावसाळा सुरू असून कोंडवाड्यात चिखल पसरला आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. जनावर दगावल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असाही प्रश्न आहे.तस्करी करताना जनावरांना मुक्त करुन कोंडवाड्यात टाकण्यात आले. त्याची सर्व जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. दरम्यान, जनावरांच्या देखभालीचा मोबदला ग्रामपंचायतीला प्राप्त होतो. तेव्हा त्यांनीच जबाबदारी स्वीकारावी, असे ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी सांगितले. (वार्ताहर)