शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

कोट्यवधीचे कोल्हापुरी बंधारे कोरडेच

By admin | Updated: December 7, 2014 22:47 IST

शासनाने सन १९९४-९५ पासून राज्य कोल्हापुरी बंधारे बांधण्याचा तगादा लावला. यासाठी विविध योजनेतून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. कोरपना तालुक्यातही १०६ कोल्हापुरी बंधाऱ्याचे

सिंचनाचे स्वप्न भंगले : १०६ बंधारे, पाणी मात्र एकाच बंधाऱ्यातनांदाफाटा : शासनाने सन १९९४-९५ पासून राज्य कोल्हापुरी बंधारे बांधण्याचा तगादा लावला. यासाठी विविध योजनेतून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. कोरपना तालुक्यातही १०६ कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम करण्यात आले. मात्र एक-दोन बंधारे वगळता बाकी बंधाऱ्यात पाणी नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे सिंचनाचे आणि भूगर्भात पाण्याची पातळी वाढवून पाणी साठा कायम ठेवण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. दुसरीकडे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ जात आहे.कोरपना तालुक्यात जिल्हा नियोजन विकास निधी, विदर्भ सदन सिंचन निधी, खनिज विकास निधी, विदर्भ विकास मंडळ, विशेष कृती कार्यक्रम, आदिवासी उपयोजना इत्यादी स्त्रोतातून या बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये सुरुवातीच्या बंधाऱ्यांसाठी साधारणत: पाच ते सहा लाख रुपये व नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांसाठी १८ ते १९ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. एका बंधाऱ्यातून ५० ते २५० हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असे अहवाल सांगतो. मात्र एक हेक्टरही सिंचन या बंधाऱ्यांमधून होताना दिसत नाही. तालुक्यात आजमितीला भोयगाव, एकोडी, माथा, शेरज, कढोली, आवारपूर, नांदा, पिपर्डा, वनसडी, हेटी, तुळशी, जेव्हरा, मांडवा, धानोली, इंजापूर, वडगाव, बिबी, लखमापूर, पिंपळगाव, पारडी, मांगलहिरा, रुपापेठ आदी गावातील बंधारे कोरडेच दिसत असून कुठे पाणी अत्यल्प आहे. यात इदापूर आणि आसन येथील बंधाऱ्यात काही प्रमाणात पाणी दिसते. मात्र बाकी बंधारे निकामी दिसून येते. याकडे संबंधित विभागाचे कमालीचे दुर्लक्ष असून बंधाऱ्याची देखभाल केली जात नाही. आवश्यक तेव्हा प्लेटा लावण्यात येत नसल्याचे पाण्याचा प्रवाह टिकून राहात नाही. याऊलट काही बंधाऱ्यांचे काम थातूरमातूर करण्यात आले असल्याने बंधाऱ्यांना तडा गेल्याचेही चित्र आहे. या बंधाऱ्याला देखभालीसाठी शासन लाखो रुपयाचे खर्च करीत असताना खर्च जातो कुठे, असा सवाल आता शेतकरी करताना दिसत आहे. कोरपना तालुक्यातील बंधाऱ्यांसाठी काही दिवसांआधी निधी मंजूर करण्यात आला. यात बंधाऱ्याची डागडुजी आणि देखभाल करणे अशी कामे करण्यात येणार होती. मात्र टक्केवारीच्या नादात सदर निधी दुसऱ्या तालुक्यात वळविण्यात आल्याची माहिती सूत्रानी दिली आहे. जिल्हा परिषद सिंचई विभागाकडे या कामाची प्रमुख जबाबदारी आहे. मात्र कर्मचारी व अधिकारी याकडे भटकतानाही दिसत नाही. शासनाने शेतकऱ्यांना पाणी मिळावे या उद्देशाने बंधारे बांधले खरे; पण सिंचन मात्र होताना दिसत नाही. याविषयी वारंवार आढावा बैठकीत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. मात्र लोकप्रतिनिधीही याकडे गंभीरपणे बघत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)