शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

कोलारा शाळेची आयएसओकडे वाटचाल

By admin | Updated: February 23, 2017 00:38 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती चिमूर अंतर्गत आदिवासी दुर्गम भागात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ...

जिल्हा परिषद शाळा : सोईसुविधांनी सुसज्ज, परिसरही स्वच्छचिमूर : चंद्रपूर जिल्ह्यातील पंचायत समिती चिमूर अंतर्गत आदिवासी दुर्गम भागात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी असलेले कोलारा (तुकूम) या गावामध्ये जिल्हा परिषदची एकमेव पहिली ते सावतीपर्यंतची शाळा आहे. त्यामध्ये ११२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गावाची लोकसंख्या जवळपास २२०० असून आदिवासी भागामध्ये नावारुपास येत असलेली गावातील एकमेव जिल्हा परिषदची शाळा आहे. सदर शाळा ही सोयीसुविधांनी सुसज्ज व देखणा परिसर हे या शाळेचे खास वैशिष्ट्य आहे.सदर शाळेत ई- लर्निंगची सुविधा विशेष म्हणजे एनसीपीडीआय नागपूर यांचे सौजन्याने बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेला क्षेत्रीय प्रबंधक नागपूर कार्यालयाचे वानरे यांचेकडून रुपये ७५ हजार किंमतीचे ५० नग डेस्बबेंच नुकतेच प्राप्त झाले आहे. तसेच आंध्रप्रदेशचे कॅबीनेटमंत्री आरव्हीएसके रंगाराव (बोंबीली) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचेकडून विद्यार्थ्यांना उच्च प्रतीची स्कूलबॅग रुपये ४० हजार किंमतीची भेट देण्यात आली आहे. कोलारा येथील वन समितीच्या वतीने शुद्ध पिण्याचे पाणी व थंड पाण्यासाठी आॅरो वॉटर फिल्टर अंदाजे ६० हजार रुपये किंमतीचे नुकतेच शाळेला भेट देण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक अशोक वैद्य यांनी चालू शैक्षणीक सत्रात अंदाजे १ लाख ७५ हजार रुपये शैक्षणिक उठाव मिळविला आहे. तसेच सीएमपीडीआय नागपूर यांचेकडून माध्यान्ह भोजन बैठक व्यवस्थेकरिता भोजन शेड व सांस्कृतीक कार्यक्रमासाठी स्टेजकरीता ५ लाख २० हजार रुपयाचे मंजूर करण्यात आले आहे.शाळेमध्ये संगणक कक्ष स्वतंत्र मुत्रीघर, किचनशेड, सांस्कृतीक मंच, दिव्यांगासाठी रॅम्पची व्यवस्था, विविध खेळाचे साहित्य, वाचनालय आदी सुविधा उपलब्ध आहे. शाळेमध्ये नियमित परिपाठ, अभ्यासगट, शालेय मंत्रीमंडळ, मिना राजू मंच, थोर व्यक्तींच्या जयंत्या- पुण्यतिथी, माझी स्वच्छ शाळा, वृक्षारोपण, विविध ड्रेस कोड, तंबाखू मुक्त शाळा, औषधी वनस्पती लागवड, परसबाग, जी तारखी तो पाढा आदी उपक्रम राबविल्या जातात. शाळा स्पर्धेत टिकण्याकरिता गावकरी श्रमदान, वस्तुरुपाने मदत, रोख रुपाने आर्थिक मदत, विविध शैक्षणिक सांस्कृतीक तथा सामाजिक कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग दर्शवितात.या सर्व बाबींमध्ये शाळेचे मुख्याध्यापक अशोक वैद्य, तंत्रस्नेही शिक्षण प्रल्हाद पाल, उपक्रमशिल शिक्षक महादेव शेडाम, पर्यावरणवादी शिक्षक नरेंद्र कामडी, मिना राजू मंच प्रमुख बेबी गजभीये, सर्वगुण संपन्न व्यक्तीम्व असलेले विलास सारये आदी शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना वाघमारे व इतर सदस्य गण, गावाचे ग्रामसेवक गजभे, सरपंच रत्नमाला गणवीर व इतर सदस्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे. (तालुका प्रतिनिधी)