शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

ताडोबाच्या जंगलातील राजाने पळवली फायबरची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 11:42 IST

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव गेट परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामावरील मजुरांनी झाडाखाली माती टाकण्याचे फायबर टोपले ठेवले होते दरम्यान, अचानक जंगलाच्या राजाने चक्क टोपले तोंडात घेऊन पसार झाल्याची घटना घडली.

ठळक मुद्देजेवणाचे डबेही पळवतात वाघोबा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव गेट परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामावरील मजुरांनी झाडाखाली माती टाकण्याचे फायबर टोपले ठेवले होते दरम्यान, अचानक जंगलाच्या राजाने चक्क टोपले तोंडात घेऊन पसार झाल्याची घटना घडली. त्याचवेळी गाईडने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपून समाज माध्यमात व्हॉयरल केल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीदेखील अशी घटना घडली होती.वाघाच्या दर्शनासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात ताडोबा अंधारी- व्याघ्र प्रकल्पाला भेट देतात. पर्यटकांनाही वाघाचे हमखास दर्शन होते. त्यामुळे दिवसागणिक पर्यटकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ताडोबाची जगभरात ओळख निर्माण झाली. ताडोबातील वाघाची संख्या वाढल्याने अधिवासासाठी जंगल कमी पडू लागले. या व्याघ्र प्रकल्पात वाघ जास्त असल्याने सहजपणे दर्शन होते. सध्या पर्यटकांच्या सुलभ प्रवासासाठी ताडोबातील अंतर्गत रस्त्याचे काम सुरू आहे.खडसंगी ते नवेगाव ताडोबा या रोडवर खडीकरण करणे सुरु आहे. या कामावर गिट्टी मुरूम पसरविण्यासाठी मजूर काम करीत आहेत. शनिवारी सकाळच्या सुमारास नवेगाव गेटपासून काही अंतरावर मजुर काम करीत असताना त्यांच्याकडील प्लास्टिक टोपले तोंडात घेऊन जंगलाचा राजा पसार झाल्याचा क्षण काही पर्यटक व गाईडने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. यापूर्वीदेखील असाच प्रकार मोहूर्ली परिसरात घडला होता. मजुरांचे जेवणाचे डब्बे तोंडात घेऊन वाघोबा पसार झाला होता.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प