शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पेरलेल्या बियाण्यांचा शेतकऱ्यांनाच ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:00 IST

तालुक्यातील गरीब शेतकरी नगद पीक म्हणून सोयाबीनचे पीक दरवर्षी घेत असतो. पण यावर्षी महाबीज कंपनीचे बियाणे वगळता शेतकऱ्यांनी लावलेल्या इतर काही कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे तर पेरले पण उगवलेच नसल्याने बियाणे ‘अदृश्य' झाले तर नाही ना असे वाटायला लागले आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाकडे तक्रार, बोगस बियाण्यांमुळे सोयाबीन उगवलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : सध्या सगळीकडे शेतीचे हंगाम सुरू झाले असून शेतकरी रात्रंदिवस आपल्या शेतात मेहनत घेत आहे. असे असले तरी जिवती तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी लावलेले सोयाबीनचे बियाणे उगविलेच नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचे बघायला मिळत आहे. ऐन हंगामाच्या दिवसात पेरणी केलेले सोयाबीन बियाण्यांनी शेतकऱ्यांना दगा दिला असून हे बियाणे बोगस आहेत. याची नुकसानभरपाई देण्यात यावी, यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभाग जिवती यांच्याकडे तक्रार केली आहे.संपूर्ण जिवती तालुका हा अतिदुर्गम असून येथे कोरडवाहू शेती आहे.कापूस, तूर, ज्वारी आणि सोयाबीनचे पीक या तालुक्यात विशेषत: घेतले जाते. शेतीला सिंचनाची कुठलीही सोय नसताना येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावरच आपली शेती करीत असतो.अशाही स्थितीत शेतकऱ्यांना जर बि- बियाणे बोगस मिळत असतील आणि उगवत नसेल तर शेतकऱ्यांनी करावे काय, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ऐन हंगामात सोयाबीन उगवलेच नसल्याने दुबार पेरणीचे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.तालुक्यातील गरीब शेतकरी नगद पीक म्हणून सोयाबीनचे पीक दरवर्षी घेत असतो. पण यावर्षी महाबीज कंपनीचे बियाणे वगळता शेतकऱ्यांनी लावलेल्या इतर काही कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलल्या जात आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे तर पेरले पण उगवलेच नसल्याने बियाणे ‘अदृश्य' झाले तर नाही ना असे वाटायला लागले आहे.यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता पंचनामा केला आणि तसा अहवाल कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही येथे पाठवला आहे. तेथील अधिकारी सोमवारी शेतात पाहणी करायला येणार आहेत, असे सांगितले. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रार केली असून त्यानुसार शेतात जाऊन आम्ही पंचनामा केला आहे. त्याचा अहवाल वरच्या पातळीवर पाठविला आहे. त्यांची चमू येणार असून त्यानुसार चौकशी होणार आहे.- पल्लवी गोडबोले,तालुका कृषी अधिकारी, जिवती

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती