शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

खांडक्या बल्लाळशहा राजाच्या समाधीची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:54 IST

येथील राजे खांडक्या बल्लाळशहा व राजे नीळकंठशहा यांची समाधी दुर्लक्षित होती.

ठळक मुद्देइको-प्रोचा पुढाकार : राजे नीलकंठशहाची समाधीही स्वच्छ

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : येथील राजे खांडक्या बल्लाळशहा व राजे नीळकंठशहा यांची समाधी दुर्लक्षित होती. परिणामी त्या समाधीवर झाडे-झुडपे वाढले होते. त्यामुळे इको-प्रो टीमकडून त्या दोन्ही समाधीची स्वच्छता करण्यात आली आहे. आता या दोन राजांच्या समाधीचे पुर्ववत सौंदर्य परत बघायला मिळत आहे.इको-प्रो संस्थेच्या वतीने चंद्रपुरातील किल्ला-परकोट स्वच्छता अभियान मागील अनेक दिवसांपासून सुरु आहे. चंद्रपूरचा किल्ला-परकोट जवळपास १० ते ११ कि.मी. लांब असून गोंड राज्याच्या सहा पिढिनी शंभर वर्षात बांधून घेतला. चंद्रपूर राज्याची निर्मिती आणि परकोटाची पायाभरणी करणारे राजे खांडक्या बल्लाळशहा आणि चंद्रपूर येथील शेवटचे गोंडराजे ज्याच्या कार्यकाळात गोंड राज्य भोसलेच्या ताब्यात गेले. आणि राजे नीळकंठशहा यांना बल्लारपूर किल्ल्यात नजरकैदेत ठेवण्यात आले. पुढे त्यांचा मृत्यु झाला. अशा दोन्ही गोंडराजे व खांडक्या बल्लाळशहा यांची राणी हिताराणी यांच्या समाधी बल्लारपूर-बामणी रोडवर पेट्रोलपंपच्या मागे असून सदर वास्तूची अवस्था ठीक नसल्याने, झाडी-झुडपे, वृक्ष-वेली अगदी वरपर्यंत वाढलेली होत्या. संस्थेतर्फे किल्ला स्वच्छता अभियान सुरु असल्याने बºयाच नागरिकांनी चंद्रपूर वसविणारे राजे खंडाक्या बल्लाळशहा यांचे समाधीच्या दुरवस्थेबाबत माहिती दिली. त्यामुळे रविवारी संस्थेच्या सदस्यांनी श्रमदान करुन किल्ल्याची स्वच्छता केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांच्या नेतृत्वात इको-प्रो पुरातत्व संवर्धन समिती प्रमुख रवी गुरनुले, नितिन बुरडकर, धर्मेद्र लुनावत, संजय सब्बनवार, राजू कहिलकार, बिमल शहा, अनिल अड्डवार, सुमित कोहले, हरीश मेश्राम, राहुल कुचनकर, वैभव मडावी, सचिन धोतरे, नीलेश मडावी, राजेश व्यास, अमोल उत्तलवार, सुधीर देव, सूरज गुंडावार, अभय अमृतकर, सौरभ शेटे, जयेश बैनलवार, कपील चौधरी, अतुल राखुंडे, हरीश मेश्राम, प्रतिक बद्दलवार, सुनील पाटील, आकाश घोड़मारे, दिवाकर प्रजापती आदी सहभागी झालेले होते. यावेळी बल्लारपुरातील पर्यावरण वाहिणीचे शरीफ त्यांचे सहकारी, चंद्रपूच्या नगरसेविका शीतल कुळमेथे, संतोष आत्राम यांनी भेट दिली व श्रमदानात सहभागी झाले.समाधींची पुरातत्व विभागाकडे नोंदच नाहीसदर गोंडराजे यांच्या समाधींची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडे अजूनही नोंद नसल्याने याकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. राजे खांडक्या बल्लाळशहा, राणी हितारानी व राजे नीळकंठशहा यांचे समाधीची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने त्वरित नोंद करुन या समाधीची देखभाल व देखरेख करुन आवश्यक डागडुजी करावी, अशी मागणी इको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे.